निलेश जोशी | कुडाळ : तालुक्यातील दुकानवाड बाजार येथील सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक गजानन सीताराम म्हाडगुत(८१) यांचे शुक्रवारी रात्री उशिरा अल्पशा आजाराने सावंतवाडी येथे निधन झाले.त्यांच्या पश्चात, पत्नी ,तीन विवाहित मुली,दोन विवाहित मुलगे,सुना,भाऊ,भावजय,पुतणे,जावंई,नाववंडे असा परिवार आहे.जिल्हा परिषद न्यु इंग्लिश स्कूल प्राथमिक शाळा हळदीचे नेरूर नं. १ शाळेचे मुख्याध्यापक सीताराम ऊर्फ उमेश म्हाडगुत यांचे वडील,केंद्र शाळा जिल्हा परिषद वाडोसच्या पदवीधर शिक्षिका सौ.समृध्दि म्हाडगुत यांचे सासरे होत.

दुकानवाड येथील गजानन सीताराम म्हाडगूत यांचे निधन
