Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

मालवण येथील भंडारी ए. सो. कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त ९ रोजी शालेय चित्रकला स्पर्धा

मालवण येथील भंडारी ए. सो. कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त ९ रोजी शालेय चित्रकला स्पर्धा

मालवण|प्रतिनिधी : मालवण येथील भंडारी ए. सो. कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त भंडारी एज्युकेशन सोसायटी, भंडारी कनिष्ठ महाविद्यालय व माजी विद्यार्थ्यांतर्फे भंडारी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, मालवण येथे रविवार, ९ मार्च रोजी सकाळी ८.३० वाजता मालवण तालुकास्तरीय शालेय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

ही स्पर्धा तीन गटांत होणार आहे. पहिला गट पहिली ते दुसरीसाठी 'निसर्गचित्र, माझे आवडते कार्टून, माझा आवडता प्राणी किंवा पक्षी' हे विषय आहेत. दुसरा गट तिसरी ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी 'पाण्याखालचे जग, मी पाहिलेला किल्ला, झाडे लावा, झाडे जगवा' हे विषय आहेत. तिसरा गट पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी 'मी पाहिलेला दशावतार, स्वच्छता ही सेवा, माझे राजे छत्रपती शिवाजी महाराज' हे विषय आहेत. तिन्ही गटांतील विजेत्यां प्रथम तीन क्रमांकांना अनुक्रमे १०००, ५००, ३०० रुपये व प्रत्येकी प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह तसेच सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरविण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी स्पर्धाप्रमुख माजी विद्यार्थी सौगंधराज बादेकर (९४२००२२८९०), शुभम मेस्त्री (९४०४९२०६३०) यांच्याशी संपर्क साधावा, स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन भंडारी ए. सो. कनिष्ठ महाविद्यालयातर्फे करण्यात आले आहे.

rapan bottom