सुशिक्षित आणि अभ्यासू नेतृत्वाचा उदय

जुबेर खान । मालवण : मालवण नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ चे बिगुल वाजले असून, शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. प्रत्येक पक्ष आणि उमेदवार मतदारांना आकर्षित करण्यासाठी आपापल्या परीने प्रचार करत आहेत. मात्र, या राजकीय गदारोळात एक नाव सध्या सर्वांच्या मुखी आहे, ते म्हणजे प्रभाग क्रमांक ७-अ मधील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार, युवा तडफदार नेतृत्व श्री. सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर.


राजकारणात केवळ अनुभवच नाही, तर शिक्षणाची आणि आधुनिक दृष्टीकोनाची गरज असते, हे सौरभ ताम्हणकर यांनी आपल्या उमेदवारीतून सिद्ध केले आहे. एक अत्यंत हुशार, सुशिक्षित आणि कामात प्रचंड गतिमान असलेले नेतृत्व म्हणून सौरभ यांची मालवण शहरात ओळख आहे. जुन्या जाणत्यांच्या अनुभवाला, आधुनिक तंत्रज्ञानाची आणि नवीन विचारांची जोड देण्याची धमक या युवा नेत्यामध्ये आहे. त्यामुळेच प्रभाग क्र. ७-अ च्या विकासासाठी भाजपने त्यांच्यावर विश्वास टाकला आहे.
सध्या सौरभ ताम्हणकर यांनी आपल्या प्रभागात प्रचाराचा धडाका लावला आहे. त्यांचा 'डोअर-टू-डोअर' प्रचार अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने सुरु असून, ते प्रत्येक मतदाराच्या घरात जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. या प्रचार फेऱ्यांमध्ये एक गोष्ट प्रकर्षाने जाणवत आहे, ती म्हणजे प्रभागातील युवा वर्गाचा त्यांना मिळणारा उत्स्फूर्त पाठिंबा. तरुणांना आपले प्रश्न सोडवणारा, आपल्या भाषेत बोलणारा आणि विकासाचे आधुनिक 'व्हिजन' मांडणारा नेता सौरभ यांच्या रुपाने सापडला आहे. "आमचा नेता, आमचा मित्र" अशी भावना प्रभागातील तरुणांमध्ये दिसून येत आहे.

केवळ निवडून येणे हे सौरभ यांचे ध्येय नसून, प्रभाग क्र. ७-अ ला एक 'मॉडेल प्रभाग' बनवण्याचे त्यांचे स्वप्न आहे. रस्ते, पाणी, वीज या मूलभूत गरजांसह युवकांसाठी रोजगार संधी आणि प्रभागाचे सुशोभीकरण यावर त्यांचे विशेष लक्ष आहे. समस्या मांडण्यापेक्षा त्या सोडवण्यावर त्यांचा भर आहे, हे त्यांच्या संवाद कौशल्यावरून मतदारांना पटत आहे.
मालवणला आता गती हवी आहे, आणि ती गती देण्याची क्षमता सौरभ ताम्हणकर यांच्यासारख्या सुशिक्षित नेतृत्वाकडे आहे. त्यामुळेच, प्रभाग क्र. ७-अ मधील सुजाण नागरिकांना आणि तमाम मतदार बंधू-भगिनींना आवाहन आहे की, विकासाची ही संधी दवडू नका. विकासाचे व्हिजन असलेल्या या आपल्या हक्काच्या माणसाला, श्री. सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर यांना प्रचंड बहुमताने विजयी करा आणि प्रभागाच्या विकासाचा मार्ग मोकळा करा.



