Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

मालवणच्या जय गणेश इंग्लिश मिडीयम स्कूलची केतकी गावकरची राज्यस्तरीय नेटबॉल स्पर्धेसाठी निवड !

मालवणच्या जय गणेश इंग्लिश मिडीयम स्कूलची केतकी गावकरची राज्यस्तरीय नेटबॉल स्पर्धेसाठी निवड !

जुबेर खान | मालवण : नुकत्याच सातारा येथे संपन्न झालेल्या कोल्हापूर विभागीय शालेय नेटबॉल स्पर्धेत मालवण येथील जय गणेश इंग्लिश मिडीयम स्कूल, मालवणच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे. या शाळेच्या १४ वर्षांखालील मुलींच्या संघाने स्पर्धेत उत्कृष्ट खेळ करत आपला ठसा उमटवला. या संघातील खेळाडू कुमारी केतकी रामकृष्ण गावकर (इयत्ता सातवी) हिची विशेषतः दखल घेण्यात आली असून, तिची धुळे येथे होणाऱ्या आगामी राज्यस्तरीय नेटबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे. जय गणेश इंग्लिश मिडीयम स्कूल, मालवणसाठी ही एक अत्यंत अभिमानास्पद बाब आहे.

जय गणेश इंग्लिश मिडीयम स्कूलच्या १४ वर्षांखालील मुलींच्या संघाने कोल्हापूर विभागीय स्पर्धेत आपल्या खेळाच्या बळावर क्रीडाप्रेमींचे लक्ष वेधून घेतले. खेळाडूंनी जिद्द, समर्पण आणि सांघिक समन्वयाच्या बळावर प्रत्येक सामन्यात उत्कृष्ट प्रदर्शन केले.

या संघातील उत्कृष्ट खेळाडू कुमारी केतकी गावकर हिने प्रतिस्पर्धी संघावर यशस्वीपणे मात करण्यात मोलाची भूमिका बजावली. तिच्या याच प्रभावी आणि लक्षवेधी खेळाच्या जोरावर तिची थेट राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. धुळे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय नेटबॉल स्पर्धेत ती आता कोल्हापूर विभागाचे प्रतिनिधित्व करेल.

केतकीच्या या यशामागे प्रशालेचे क्रीडा शिक्षक निशाकांत पराडकर आणि पंकज राणे तसेच मार्गदर्शक दिनेश चव्हाण यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. त्यांच्या कठोर परिश्रमामुळे आणि अचूक प्रशिक्षणाने केतकीच्या खेळाला नवी दिशा मिळाली.

कुमारी केतकी गावकरच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मालवण एज्युकेशन सोसायटी, मालवणचे सर्व पदाधिकारी, प्रशालेच्या मुख्याध्यापिका तेजल वेंगुर्लेकर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक यांनी तिचे अभिनंदन केले असून, राज्यस्तरीय स्पर्धेसाठी तिला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. मालवणचे नाव राज्यस्तरावर उंचावण्यासाठी केतकी सज्ज झाली आहे.

ruchira top