Thursday, 29 October 2026
Latest News
‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड
ruchira top

भुईबावडा येथील दुग्ध व्यवसाय शेतकऱ्यांची दिवाळी गोड

भुईबावडा येथील दुग्ध व्यवसाय शेतकऱ्यांची दिवाळी गोड

2 लाख 21 हजार रुपये बोनसचे वितरण; वार्षिक दूध संकलन एक लाख लिटर

वैभवाडी | प्रतिनिधी : भुईबावडा येथील रवळनाथ सहकारी दुग्ध व्यवसाय संघामार्फत दिवाळी बोनसचे वाटप करण्यात आले. या डेअरीचे वार्षिक दूध संकलन जवळजवळ १ लाख लीटर इतके आहे. या डेअरीमध्ये एकूण ६५ शेतकरी दूध संकलन करतात. यावेळी दिवाळी बोनस म्हणून लिटरला 3 रुपये इतका दर देण्यात आला आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांची दिवाळी गोड झाल्याने शेतकरी आनंदी झाला आहे.


यावर्षी एकूण 2 लाख 21 हजार रुपये इतक्या बोनसचे वाटप करण्यात आले आहे. यावर्षी अतिरिक्त दूध संकलनामध्ये उज्वला उदय मोरे, अरुण अमृत मोरे, विश्वनाथ राणे या तिघांनी अनुक्रमे नंबर मिळविला आहे.


यावेळी रवळनाथ सहकारी दुग्ध व्यवसाय संस्थेचे अध्यक्ष अरुण मोरे, उपाध्यक्ष सुरेश मोरे, सचिव रविंद्र बिले, सदस्य शांताराम देसाई, विलास रेडिज, आकोबा मोरे, संतोष विचारे, उज्वला मोरे, भुईबावडा गावचे प्रतिष्ठित नागरिक तानाजी मोरे, बाळा साईल, उमेश पांचाळ, सौ. श्वेता मोरे, अनिल देसाई, राजाराम मोरे, जनार्दन मोरे, रमेश मोरे, उदय मोरे, आकाराम मोरे, अमिन शाहा, प्रकाश साईल आदी शेतकरी उपस्थित होते.

rapan bottom