शानू वालावलकर | मालवण : श्रावण येथील महात्मा गांधी विद्यालय श्रावण नंबर १ या शाळेमध्ये शिवसेना शाखा श्रावण च्या वतीने विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या.
कुडाळ मालवण मतदार संघाचे आमदार निलेश राणे व शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या पुढाकारातून जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र यांचे संस्थापक तथा शिवसेना उपनेते निलेश सांबरे यांच्या वतीने या वह्या वाटप करण्यात येत आहेत. शिवसेना तालुकाप्रमुख विनायक बाईत यांच्या माध्यमातून परिसरातील गावांमध्ये या वह्या वितरित केल्या जात आहेत. श्रावण शाळेत हा कार्यक्रम शिवसेना शाखाप्रमुख संतोष परब, पाणलोस मठ बुद्रुक गावचे शाखाप्रमुख कृष्णा बाईत, माजी सरपंच प्रशांत परब, माजी शाखाप्रमुख स्वप्नील दळवी, आकाश परब, मंगेश यादव, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शिवराम परब, उपशाखाप्रमुख महेश दळवी, सरपंच नम्रता मुद्राळे, उपसरपंच दुलाजी परब तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य श्रावण यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनायक हरकुळकर व आभार अमित पवार यांनी मानले. यावेळी विद्यार्थी, शिक्षक सुषमा घोगळे, शालेय पोषण आहाराच्या रोहिणी पवार, सुवर्णा दळवी उपस्थित होते.

