हार्मोनियम, ढोलकी आणि बेस ड्रम भेट ; कलाशिक्षणाला प्रोत्साहन
मालवण | प्रतिनिधी : पुस्तकी शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कलाशिक्षणालाही अनन्यसाधारण महत्त्व आहे. विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव मिळावा आणि शालेय सांस्कृतिक कार्यक्रमांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने शारदोत्सवानिमित्त दांडी शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत शैक्षणिक उठावातून शाळेला संगीत साहित्य भेट दिले. यामध्ये हार्मोनियम, ढोलकी आणि बेस ड्रम या वाद्यांचा समावेश आहे.
माजी विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत शाळेसाठी दिलेल्या या योगदानामुळे विद्यार्थ्यांना संगीत व सांस्कृतिक उपक्रमांसाठी आवश्यक साहित्य उपलब्ध झाले आहे. शालेय कार्यक्रम, विविध स्पर्धा आणि सांस्कृतिक सादरीकरणांमध्ये या वाद्यांचा उपयोग होणार असून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना चालना मिळणार आहे.
या उपक्रमांत मालवणचे नगरसेवक श्री. महेश कोयंडे यांनी ढोलकी भेट दिली. तसेच श्रीमती सरिता तानावडे ऊर्फ सिद्धी तानावडे, श्री. प्रवीण कुबल, ॲड. श्रीमती लता कुबल, श्री. रुपेश प्रभू, श्री. गणेश चिंदरकर, राज्य पुरस्कारप्राप्त माजी शिक्षक श्री. शिवराज सावंत, श्री. भगवान मानवर, श्री. अभय मोहन गावकर, श्री. निखिल गणपत गावकर, अमेरिका स्थित श्री. गणेश भिकाजी दुदवडकर, श्री. उत्तम गावकर आणि श्रीमती सुप्रिया परब यांनी हार्मोनियम व बेस ड्रम भेट देऊन शाळेच्या उपक्रमाला हातभार लावला.
या कार्यासाठी श्री. नारायण धुरी यांनी उत्तम सहकार्य केले. माजी विद्यार्थ्यांनी शाळेशी असलेले ऋणानुबंध जपत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक प्रगतीसाठी केलेला हा प्रयत्न कौतुकास्पद ठरत आहे.
या उपक्रमाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती विशाखा चव्हाण, शिक्षिका श्रीमती श्रद्धा बागवे, श्रीमती अमृता राणे आणि श्रीमती उज्ज्वला चौकेकर यांनी सर्व देणगीदारांचे आभार मानले.
माजी विद्यार्थ्यांनी जपलेली शाळेविषयीची आपुलकी आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्याची भावना या उपक्रमातून अधोरेखित झाली आहे.
▪️अमित खोत | मालवण

दांडी | शारदोत्सवानिमित्त माजी विद्यार्थ्यांकडून दांडी शाळेला संगीत साहित्य भेट!
