Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

ऊॅं जय माऊली मित्र मंडळातर्फे विठ्ठल रखुमाई दिंडी सोहळा पदयात्रा आयोजन

ऊॅं जय माऊली मित्र मंडळातर्फे विठ्ठल रखुमाई दिंडी सोहळा पदयात्रा आयोजन

मुंबई : विठ्ठल म्हणजे महाराष्ट्र पुजल्या जाणा-या , विष्णूचे एक असलेले देव , त्यांना विठोबा किंवा पांडुरंग या नावाने ओळखले जाते. ते विटेवर उभे असलेले, भक्त पुंडलिकासाठी असलेलं असे त्यांचे रुप आहे, ज्याला विठ्ठल किंवा पांडुरंग ओळखले जाते. विठ्ठल दिंडी सोहळा, वारकरी संप्रदायाचा एक महत्त्वाचा भाग आहे. आषाढी एकादशीला पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी वारकरी दिंडी जाते. दिंडीमध्ये टाळकरी, विणेकरी, अभंग गाणारे आणि मुखाने विठ्ठलाचे नामस्मरण करणारे वारकरी असतात.
अशीच एक दिंडी म्हणजे ऊॅं जय माऊली मित्र मंडळ, चंदनबाळा , वाळकेश्र्वर, मुंबई यांच्या वतीने विठ्ठल रखुमाई दिंडी सोहळा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी आषाढी एकादशी वारीला वारकरी दिंडी घेऊन जातात. दिंडीमध्ये महिला डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन चालतात.परंपरेने चालत आलेल्या या वारकऱ्यांच्या दिंड्या, गीत, भजन, कीर्तन गात तसेच वादळ , पाऊस यांचा मारा सोसत पायी जातात. या दिंडी मध्ये अनेक वारकरी सहभागी होत असतात. राम कृष्ण हरी… माऊली माऊली… ज्ञानोबा तुकाराम… असा जयघोष सुरू असतो. विठ्ठलाला भेटण्यासाठी वारकरी आतुरलेले असतात.
सदर पदयात्रा सोहळा शनिवार दिनांक ०५ जुलै २०२५ रोजी रात्रौ ९.३० वाजता चंदनबाळा-रिज रोड-वाळकेश्वर-बाबुलनाथ-पेडर रोड-हाजी अली-सिद्धिविनायक मंदिर वडाळा (विठ्ठल रखुमाई मंदिर) असा पार पडणार आहे. या दिंडी सोहळ्याचे पुरस्कर्ते संजय भाऊ शिर्के हे आहेत. तरी तरी भाविकांनी दिंडी सोहळा पदयात्रेचा लाभ घ्यावा , असे आव्हान मंडळाचे अध्यक्ष रमेश कळंबाटे , उपाध्यक्ष शैलेश शिगवण व इतर सहकारी यांनी केले आहे. तसेच भाविकांना परतीच्या प्रवासासाठी गाडीची सुविधा केली आहे‌.अधिक माहितीसाठी भ्रमणध्वनी : रमेश कळंबाटे ९७५७३८६५९४, नरेश मोरे ७०३९४९८६९९ यांच्याशी संपर्क साधावा.

rapan bottom