मुंबई : गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त दत्त मंदिर, ताडदेव फॉजेत हिल येथे गुरुवार, १० जुलै २०२५ रोजी मोठ्या उत्साहात गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला. या मंगलमय प्रसंगी अनेक मान्यवर आणि भाविकांनी आपली उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
या पवित्र उत्सवाचे औचित्य साधून सद्गुरू सदानंद महाराज प्रेरित सच्चिदानंद गीत पुष्पांजली, दत्त मंदिर, ताडदेव यांच्या वतीने निर्मित "माऊलीचा दरबार" या भक्तीगीतांच्या अल्बमचे दिमाखदार उदघाटन करण्यात आले.
या विशेष प्रकाशन सोहळ्याला श्री. सद्गुरू सेवा मंडळ, मुंबईचे अध्यक्ष श्री. विलास झाड आणि शिष्य प्रमुख श्री. रमाकांत नारकर हे प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते. त्यांच्या शुभहस्ते या अल्बमचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी उपस्थित भक्तांनी अल्बममधील भक्तीगीतांचा मनमुराद आस्वाद घेतला आणि या सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

