गुरुपौर्णिमा पावन दिवसाचे औचित्य
मुंबई : गुरुपौर्णिमेच्या पावन दिवशी कोकणचे भाग्यविधाते, माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री खासदार सन्माननीय श्री. नारायणरावजी राणे साहेब यांची आमदार निलेश राणे यांनी भेट घेऊन आशीर्वाद घेतले.

आज गुरुपौर्णिमेच्या पावन दिवशी कोकणचे भाग्यविधाते, माजी मुख्यमंत्री तथा खासदार सन्माननीय श्री. नारायणरावजी राणे साहेब आणि शिवसेनेचे मुख्य नेते, महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री सन्माननीय श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांची सदिच्छा भेट घेतली.
या पवित्र दिवशी गुरुपौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्याकडून शुभाशीर्वाद प्राप्त केले. या प्रेरणादायी नेतृत्वाचे मार्गदर्शन लाभणे, हे माझ्यासाठी मोठे सौभाग्य आहे. असे आमदार निलेश राणे म्हणाले.

