मिली मिश्रा | कुडाळ : येथील रा. ब. अनंत शिवाजी देसाई वाचनालय व ग्रंथसंग्रहालय (जिल्हा ग्रंथालय) च्यावतीने राजा राममोहन रॉय यांच्या जयंतीनिमित्त २२ मे रोजी सकाळी ९.३० वाजता वाचनालयाच्या सभागृहात हिंदी व इंग्रजी भाषेतील ग्रंथांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन सकाळी ९ ते सायंकाळी ७या वेळेत सर्वांसाठी खुले राहणार आहे. जास्तीत-जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन ग्रंथालयाचे अध्यक्ष अरविंद शिरसाट यांनी केले आहे.

२२ रोजी कुडाळ वाचनालय येथे ग्रंथप्रदर्शन.
