Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

परिचारिका या वैद्यकीय क्षेत्राचा कणा : सौ. अवंतिका कुलकर्णी

परिचारिका या वैद्यकीय क्षेत्राचा कणा : सौ. अवंतिका कुलकर्णी

बॅ. नाथ पै नर्सिंग कॉलेजमध्ये परिचारिका दिन साजरा

निलेश जोशी | कुडाळ : रुग्णांच्या वेदना जाणून घेताना, त्यांना सेवा देताना स्वतःला सांभाळायला शिका. स्वतःला जपा. परिचारिका वैद्यकीय क्षेत्राचा कणा आहे. त्यांनी स्वतःला शारीरिक व मानसिक दृष्ट्या सांभाळलं पाहिजे. कारण तुम्ही सुदृढ व आनंदी असाल तरच रुग्णाला चांगल्या प्रकारची सेवा देऊ शकता. असे मत, सहाय्यक धर्मदाय आयुक्त सौ. अवंतिका कुलकर्णी यांनी व्यक्त केले. बॅ. नाथ पै नर्सिंग कॉलेज कुडाळ येथे जागतिक परिचारिका दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या.


दीपप्रज्वलन, सरस्वती पूजन व फ्लोरेन्स नाईंटीगल यांची प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. या कार्यक्रमास व्यासपीठावर बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय उमेश गाळवणकर, नर्सिंग कॉलेज प्राचार्या सौ.कल्पना भंडारी, प्रा.सौ. वैशाली कोलगावकर , सौ.शांभवी आजगावकर, सौ. सुमन करंगळे, प्रणाली मयेकर, प्रथमेश हरमलकर, वैजयंती नर, शंकर माधव आदी उपस्थित होते.
सौ. कुलकर्णी पुढे म्हणाल्या, आयुष्य जगत असताना जीवनात चांगल्या मूल्यांना स्थान द्या, त्यांना जपा. तरच तुम्ही स्वतःच्या भूमीकेला न्याय देऊ शकता, कारण आपल्याकडे येणारे रुग्ण त्यांच्या बऱ्याच प्रकारच्या शारीरिक व मानसिक वेदना घेऊन आलेले असतात. त्यांना समजून घेऊन सेवा देणे हे अत्यंत गरजेचे आहे .कारण तुम्ही सर्व परिचारिकाच आरोग्य यंत्रणेमध्ये रुग्णांच्या जास्त सोबत असता. त्यांचं सकारात्मक वागणच रुग्णाला बळ देत. या क्षेत्रामध्ये स्त्रियांचा जास्त भरणा आहे .स्त्री ही अबला नसून सबल आहे त्यामुळे तुम्ही स्वतःची ताकद ओळखा. असेही मार्गदर्शन त्यांनी केले.
संस्था चेअरमन उमेश गळवणकर म्हणाले, नेहमी आनंदी रहा. कारण तुम्ही आनंदी असाल तरच तुमच्या हातून रुग्णसेवा उत्तम होईल. कारण निर्मळ हास्य हेच सर्व आजारांवरील एक सर्वात उत्तम असा उपाय आहे आणि ज्याला आपल्याला पैसे अजिबात द्यावे लागत नाहीत. त्यामुळे उत्तम आरोग्य मिळवा व सुदृढ रहा.


नर्सिंग कॉलेज प्राचार्या सौ.कल्पना भंडारी यांनीही सर्व विद्यार्थी विद्यार्थ्यांना परिचारिका दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
या दिनाचे औचित्य साधून विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी भित्तीपत्रिका, प्रश्नमंजुषा आणि वक्तृत्व स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. याला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी या स्पर्धांच्या विजेत्यांचे पारितोषिक वितरण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच शैक्षणिक वर्षात विविध कलागुणांमध्ये प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचे देखील गुणगौरव या दिनाचे औचित साधून करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन सेजल नाईक हिने केले.

rapan bottom