Sunday, 01 November 2026
Latest News
दांडी परिसरात अवैध दारूविक्रीवर पोलिसांचा छापा ; ५ लाख ३८ हजारांची गोवा बनावटीची दारू जप्त! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा दांडी परिसरात अवैध दारूविक्रीवर पोलिसांचा छापा ; ५ लाख ३८ हजारांची गोवा बनावटीची दारू जप्त! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा
ruchira top

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड एग्रीकल्चर कोकण विभागीय उपाध्यक्ष दीपक परब यांनी घेतली फ्लाय 91 विमान कार्यालयात अधिकाऱ्यांची भेट

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड एग्रीकल्चर कोकण विभागीय उपाध्यक्ष दीपक परब यांनी घेतली फ्लाय 91 विमान कार्यालयात अधिकाऱ्यांची भेट

सिंधुदुर्ग- मुंबई विमानसेवा फ्लाय 91 ने सुरू करावी ; मासीया तर्फे मागणी

सिंधुदुर्ग: महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड एग्रीकल्चर चे अध्यक्ष ललित गांधी साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली कोकण विभागाचे उपाध्यक्ष श्रीकृष्ण उर्फ दीपक परब तसेच गव्हर्निंग कौन्सिल मेंबर संतोष राणे व राजन नाईक यांनी फ्लाय 91 या विमान कंपनीच्या गोवा येथील कार्यालयात कंपनीचे मालक व अधिकारी यांची भेट घेतली.

यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळावरून फ्लाय 91 ची उड्डाणे नियमित होण्यासाठी आग्रही निवेदन दिले. प्रामुख्याने सिंधुदुर्ग- मुंबई विमानसेवा सुरू होण्यासाठी फ्लाय91 ने प्रयत्न करावेत अशी मागणी मासीया तर्फे करण्यात आली. त्यावेळी ही सेवा सुरू होण्यासाठी मुंबई येथे मुंबई विमानतळावर स्लॉट मिळणे अत्यावश्यक असल्याचे विमान कंपनीकडून सांगण्यात आले, व त्याचवेळी विमान कंपनीचे मालक श्री मनोज जी चाको यांनी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स ने सदरील स्लॉट मिळवण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत अशी विनंती केली. त्यानंतर श्रीकृष्ण परब यांनी सिंधुदुर्ग- सोलापूर, सिंधुदुर्ग -पुणे, सिंधुदूर्ग - नाशिक, सिंधुदूर्ग - छत्रपती संभाजीनगर, सिंधुदुर्ग- हैदराबाद व सिंधुदुर्ग- बेंगलोर ही विमान सेवा सुरू करण्याविषयी निवेदन दिले. त्यालाही फ्लाय 91 च्या अधिकाऱ्यांनी मान्यता देत लवकरच या सेवा ही नियमित करण्यात येतील असे आश्वासित केले. यावेळी फ्लाय 91 चे सर्वेसर्वा मनोज जी चाको, चीफ रेवेन्यू ऑफीसर आशुतोष चिटणीस, जनरल मॅनेजर निमिश जोशी, आणि सेल्स मॅनेजर सतीश खाडे उपस्थित होते.

rapan bottom