Sunday, 01 November 2026
Latest News
दांडी परिसरात अवैध दारूविक्रीवर पोलिसांचा छापा ; ५ लाख ३८ हजारांची गोवा बनावटीची दारू जप्त! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा दांडी परिसरात अवैध दारूविक्रीवर पोलिसांचा छापा ; ५ लाख ३८ हजारांची गोवा बनावटीची दारू जप्त! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा
ruchira top

दांडी परिसरात अवैध दारूविक्रीवर पोलिसांचा छापा ; ५ लाख ३८ हजारांची गोवा बनावटीची दारू जप्त!

दांडी परिसरात अवैध दारूविक्रीवर पोलिसांचा छापा ; ५ लाख ३८ हजारांची गोवा बनावटीची दारू जप्त!

गोवा बनावटीच्या दारूचे तब्बल ८० बॉक्स हस्तगत ; तिघांविरोधात गुन्हा दाखल

परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक दीपक शेलार यांच्या नेतृत्वाखाली मालवण पोलिसांची धडक कारवाई

मालवण | प्रतिनिधी :
मालवण शहरातील दांडी परिसरात सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांनी धडक कारवाई करत तब्बल ५ लाख ३८ हजार रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू जप्त केली आहे. शनिवारी, ३१ ऑक्टोबर रोजी रात्री करण्यात आलेल्या या छापेमारीत गोवा बनावटीच्या दारूचे तब्बल ८० बॉक्स हस्तगत करण्यात आले. या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध दारूविक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
मालवण शहरातील दांडी परिसरात अवैध दारूविक्रीविरोधात पोलिसांनी ही कारवाई केली. छाप्यादरम्यान मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीचा मद्यसाठा आढळून आला. पोलिसांनी एकूण ८० बॉक्स दारू जप्त केली असून, या मुद्देमालाची किंमत ५ लाख ३८ हजार रुपये असल्याची माहिती देण्यात आली आहे. या प्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर आणि अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक दीपक शेलार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश माने, पोलीस उपनिरीक्षक भगत, पोलीस उपनिरीक्षक अभिजित भोसले, पोलीस हवालदार सुहास पांचाळ आणि पोलीस हवालदार सुप्रिया पवार यांचा सहभाग होता.

मालवण शहरात गोवा बनावटीच्या अवैध दारूचा मोठा साठा जप्त करण्यात आल्याने ही कारवाई महत्त्वपूर्ण ठरली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

▪️अमित खोत | मालवण

rapan bottom