Friday, 30 October 2026
Latest News
सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड
ruchira top

संस्कृती जपणाऱ्या धार्मिक उत्सवांसोबत सभ्यता व सौम्यता कोकणभूमीत!

संस्कृती जपणाऱ्या धार्मिक उत्सवांसोबत सभ्यता व सौम्यता कोकणभूमीत!

कोकणचा सुपुत्र असल्याचा अभिमान

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर

पेंडूर येथील त्रैवार्षिक मांड उत्सवात देवतां चरणी नतमस्तक

मालवण | प्रतिनिधी : देवातांच्या उत्सवांची संस्कृती कोकणात रुजली आहे. येथील पिढ्या ही संस्कृती पुढे नेत आहेत. मातोंड, पेंडूर व अन्य गावात साजरे होणारे देवीचे उत्सव त्याच परंपरेने अतिशय उत्साहात साजरे होतात. धार्मिक उत्सवांसोबत सभ्यता व सौम्यता कोकण भूमीत आहे. माझीही नाळ तळकोकणशी जुळली असून कोकणचा सुपुत्र असल्याचा अभिमान आहे. असे प्रतिपादन महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मालवण पेंडूर येथे बोलताना केले.

कोकणचा विकास हे माझे कर्तव्य नव्हे तर धर्म आहे. कोकणात विकास आणि रोजगार निर्माण व्हावे यावर प्राधान्य राहील. मुंबईत गेलेला कोकणी माणुसही पुन्हा कोकणात माघारी येईल अश्या रोजगाराच्या संधी याठिकाणी उपलब्ध होतील. असा विश्वासाही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी यां निमित्ताने व्यक्त केला.



महाराष्ट्र विधानसभेचे सलग दुसऱ्यांदा अध्यक्षपद भूषवित असलेले विद्यमान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेल्या मालवण पेंडूर येथील ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या देवीच्या त्रैवार्षिक मांड उत्सवाला भेट देत श्री देवी जुगाई देवी व श्री देव वेताळ यांचे समोर नतमस्तक होत दर्शन घेतले.



यावेळी देवस्थान ट्रस्ट कमिटी, पाच बारा मानकरी, गावकर मंडळी, ग्रामस्थ यांच्यावतीने त्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी कुडाळ प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे, मालवण तहसीलदार वर्षा झालटे देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष विनायक सावंत पटेल, सचिव ऍड अमित रेगे कुलकर्णी, खजिनदार सुनील परब, दाजी सावंत, रमेश सावंत, दिलीप परब,  प्रमोद परब, नंदकुमार परब, बिपिन परब, दीपा सावंत, सरपंच नेहा परब, उपसरपंच सुमित सावंत, ग्रा प सदस्य वैष्णवी लाड, अश्विनी पेडणेकर, अंकिता सावंत ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती कोठावळे रामू सावंत, भाऊ पटेल, संदेश नाईक, शेखर फोंडेकर, अमित सावंत, संतोष सावंत, विष्णु लाड, यश नाईक व अन्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयेंद्रथ परब यांनी केले.

rapan bottom