ठाकरे शिवसेना मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांची माहिती
मालवण : चिपी विमानतळावरून मुंबई विमानसेवा सुरू व्हावी याबाबत सत्ताधारी मंडळीवर जनतेतून दबाव गरजेचा आहे. यासाठी शिवसैनिक, व्यापारी, पर्यटक व विमान प्रवासी यांच्याकडून केंद्रीय विमान उडान मंत्री यांना पत्र तसेच ई-मेल माध्यमातून संपर्क साधून त्यांच्याकडे विमानसेवा सुरू करण्याची मागणी लावून धरण्यात येणार आहे, अशी माहिती ठाकरे शिवसेना मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी दिली.
मालवण तालुका ठाकरे शिवसेना कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत श्री. खोबरेकर बोलत होते. यावेळी पदाधिकारी यांच्यावतीने घोषणाबाजी करत विमानसेवा सुरु करण्याची मागणी केली. कोण म्हणतो देणार नाय, घेतल्याशिवाय जाणार नाय, विमानसेवा आमच्या हक्काची.... अशाप्रकारच्या घोषणा पावेळी देण्यात आल्या. यावेळी माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, जिल्हा प्रवक्ते मंदार केणी,
नितीन बाळके, माजी नगरसेवक यतीन खोत, शहरप्रमुख बाबी जोगी, युवा सेना शहरप -मुख मंदार ओरसकर, नंदू गवंडी, वायरी मूतनाथ सरपंच भगवान लुडबे, निनाक्षी शिंदे, नरेश हुले, उमेश चव्हाण, राहुल जाधव, सुरेश मडये, आल्मेडा, दत्ता पोईपकर तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पर्यटनाच्या दृष्टीने आणि वाहतूक सेवेच्या दृष्टीने चिपी येथे सुरु झालेली चिपी ते मुंबई आणि मुंबईते चिपी ही विमानसेवा कित्येक दिवस याठिकाणी बंद आहे. परंतु अद्यापही आजच्या शासनाने आजच्या सरकारने या ठिकाणी त्याची दखल घेतलेली नाही, आणि ही विमानसेवा आजही बंद आहे. ही विमानसेवा पूर्ववत व्हावी जेणेकरून मुंबईतून येणारे चाकरमानी असतील पर्यटनासाठी येणारे पर्यटक असतील, एकूणच विमान सर्व प्रसावी यांच्या दृष्टीने पुन्हा एकदा ही चिपी ते मुंबई आणि मुंबई ते चिपी विमान सेवा सुरू करावी अशा आशयाचे पत्र विमान वाहतूक मंत्री किंजारापू राममोहन नायडू यांना आम्ही पाठवत आहोत, असेही श्री. खोवरेकर म्हणाले.
जनतेने दबाव निर्माण करणे आवश्यक आहे. यामुळे उबाठा शिवसेनेच्या वतीने सर्व जिल्हावासीयांना आव्हान करतो की ज्या ज्या जिल्हा वासीयांना वाटते की ही विमानसेवा पूर्ववत झाली पाहिजे आणि त्यातून या सिंधुदुर्गचा विकास झाला पाहिजे यासाठी ही विमान सेवा चालू करण्यासाठी प्रत्येक सिंधुदुर्गवासीयांनी अशा
आशयाचे पत्र किंवा ज्याला ईमेल आयडी करता येत असेल त्यांनी ईमेलच्या माध्यमातून ही विमानसेवा चालू झाली पाहिजे अशा आशयाचे पत्र दिलं पाहिजे. आज ही मालवण तालुक्यामध्ये मोहिम सुरू झालेली आहे. आणि उद्यापासून संपूर्ण जिल्ह्यामध्ये आम्ही घेत आहोत. त्यासह इच्छुक प्रवासी यांनीही हा पत्र व्यवहार निश्चितपणे करावा आणि ही विमानसेवा लवकरात लवकर सुरू व्हावी ही आमची इच्छा आहे, असेही खोबरेकर म्हणाले आहेत.

चिपी मुंबई व मुंबई चिपी विमान सेवेसाठी विशेष 'पत्र' मोहीम
