Friday, 30 October 2026
Latest News
सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड
ruchira top

सिंधुदुर्ग मत्स्य विभागाची एलईडी नौकेवर कारवाई

सिंधुदुर्ग मत्स्य विभागाची एलईडी नौकेवर कारवाई

नौका तसेच १२ लाख किंमतीची लाईट, जनरेटर व अन्य सामग्री जप्त

मालवण | प्रतिनिधी : आमदार निलेश राणे यांनी हिवाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी मच्छिमारांचे प्रश्न आक्रमक पणे मांडले. याचं दरम्यान ना. नितेश राणे यांनी मत्स्य व बंदर मंत्रालयाचा पदभार स्वीकारल्या नंतर परराज्यातुन येणाऱ्या हायस्पीड नौका, अनधिकृत एलईडी लाईट नौकांवर धडक कारवाई मत्स्य विभाग व प्रशासकीय यंत्रणाकडून सुरु आहे. सिंधुदुर्ग मत्स्य विभागाने सोमवारी सायंकाळी एलईडी नौकेवर कारवाई करत नौका ताब्यात घेतली आहे.

महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ व सुधारणा अधिनियम २०२१ अंतर्गत एल.ई. डी. नौकेवर कारवाई करण्यात आली आहे.

सोमवारी सायंकाळी देवगड समोर समुद्रात मत्स्यव्यवसाय विभागाचे अंमलबजावणी अधिकारी मुरारी भालेकर, सहाय्यक मत्स्य. विकास अधिकारी (परवाना अधिकारी, मालवण) यांनी नियमित गस्त घालत होते. यावेळी राज्याच्या जलधी क्षेत्रासाठी परवाना असलेली नौका चांदणी १ नों. क्र.- आयएनडी-एमएच -५-एमएम -७५८ द्वारे महाराष्ट्रातील जलधी क्षेत्रात देवगड समोर अनधिकृतरित्या एल.ई.डी. लाईट व्दारे असलेल्या नौकेवर कारवाई केली. या नौकेवर नौका तांडेलसह २ खलाशी होते.

सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय सिंधुदुर्ग सागर कुवेसकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. सदर नौका जप्त करून सर्जेकोट बंदरात ठेवण्यात आली आहे. त्यावर मासळी आढळून आलेली नाही. मात्र नौकेवर असणारे प्रखर लाईट व लाईट पुरवणारी उपकरणे जप्त करून सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधदुर्ग कार्यालयात ठेवण्यात आली आहेत. अंदाजे १० ते १२ लाख किंमतीची लाईट, जनरेटर व इतर सामग्री जप्त करण्यात आली आहे.

अंमलबजावणी अधिकारी श्री. मुरारी भालेकर, सहाय्यक मत्स्य. विकास अधिकारी (परवाना अधिकारी, मालवण) यांनी पोलिस कर्मचारी संकेत तांडेल तसेच दिपेश मायबा व सागर परब, सागरी सुरक्षा पर्यवेक्षक मालवण यांचे सहकार्याने सदर कारवाई केली आहे. अंमलबजावणी अधिकारी यांनी प्रतिवेदन दाखल केल्यानंतर सदर नौकेबाबत सुनावणी सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग यांचे कोर्टात ठेवण्यात येणार आहे. अशी माहिती मत्स्य विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

फोटो : सिंधुदुर्ग मत्स्य विभागाने एलईडी नौकेवर कारवाई करतं
नौका तसेच १२ लाख किंमतीची लाईट, जनरेटर व अन्य सामग्री जप्त केली. (अमित खोत, मालवण)

rapan bottom