Friday, 30 October 2026
Latest News
सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड
ruchira top

मालवण पंचायत समितीच्या क्रीडा महोत्सवाचे उदघाटन

मालवण पंचायत समितीच्या क्रीडा महोत्सवाचे उदघाटन

पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या हस्ते मशाल पेटवून क्रीडा स्पर्धांचा शुभारंभ

अधिकारी व कर्मचारी यांचा उत्स्फूर्त सहभाग

मालवण | प्रतिनिधी : मालवण पंचायत समिती यांचा वतीने अधिकारी व कर्मचारी यांच्या सहभागातील तालुकास्तरीय क्रीडा महोत्सवाचे उदघाटन टोपीवाला बोर्डिंग मैदान येथे गटविकास अधिकारी तथा प्रशासक प्रफुल्ल वालावलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले. श्रीफळ वाढवून तसेच ज्योत प्रज्वलीत करून मशाल पेटवत क्रीडा स्पर्धांचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी, पंचायत समिती प्रशासक तथा गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर, उपअभियंता बांधकाम विभाग संतोष सावर्डेकर, गटशिक्षणाधिकारी संजय माने, कृषी विस्तार अधिकारी पंचायत समिती व्ही के जाधव, विस्तार अधिकारी पी.डी, जाधव, शिक्षण विस्तार अधिकारी उदय दीक्षित, विस्तार अधिकारी (सांख्यिकी) श्रीकृष्ण सावंत, आरोग्य पर्यवेक्षक सुरज बांगर यांसह सर्व केंद्रप्रमुख, शिक्षक, पंचायत समितीचे सर्व विभागांचे अधिकारी कर्मचारी, तसेच हडी व कोळंब गावचे सरपंच व उपसरपंच, पंच आदी उपस्थित होते. सर्वांनी क्रीडा प्रतिज्ञा घेतली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटशिक्षणधिकारी संजय माने यांनी करताना क्रीडा स्पर्धेची रुपरेषा स्पष्ट केली. गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर, पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनीही विचार मांडले. तसेच सर्व सहभागी यांना शुभेच्छा दिल्या. अधिकारी, कर्मचारी यांच्या उत्स्फूर्त सहभागातून दिवसभर विविध क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या.

rapan bottom