मालवण : तालुकास्तरीय पाढे पाठांतर स्पर्धेत देवबाग हायस्कूलने यश प्राप्त केले. रोटरी क्लब मालवण आयोजित रो.अपूर्व फर्नांडिस पुरस्कृत शालेय विद्यार्थ्यांसाठी मालवण तालुकास्तरीय पाढे पाठांतर स्पर्धा जय गणेश इंग्लिश स्कूल, मालवण या ठिकाणी पार पडली.
या एका वेगळ्या स्पर्धेमध्ये मालवण तालुक्यातून तब्बल 60 विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला होता. यामध्ये इयत्ता पाचवी ते इयत्ता सातवी या लहान गटामध्ये अखिल देवबाग विकास मंडळ मुंबई संचालित डॉ. दत्ता सामंत इंग्लिश स्कूल देवबाग या प्रशालेचा इयत्ता पाचवीतील विद्यार्थी कुमार गंधार दत्तप्रसाद तेंडोलकर यांने तृतीय क्रमांक पटकाविला. या यशाबद्दल त्याचे व त्याच्या पालकांचे प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.रचना रुपेश खोबरेकर, सर्व शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व संस्था पदाधिकारी, ग्रामस्थ व पालक यांनी अभिनंदन केले.

