Friday, 30 October 2026
Latest News
सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड
ruchira top

आमदार निलेश राणे यांच्या दणक्यानंतर नगरपरिषद प्रशासन ऍक्शन मोडवर

आमदार निलेश राणे यांच्या दणक्यानंतर नगरपरिषद प्रशासन ऍक्शन मोडवर

आमदार निलेश राणे यांची कामगिरी दमदार

माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर

मालवण | प्रतिनिधी : मालवण शहरातील विविध समस्या प्रशनी नागरिकांच्या प्राप्त तक्रारीनुसार आमदार निलेश राणे यांनी दोन दिवसांपूर्वी मालवण शहरात रात्री फिरून स्पॉट पंचनामा केला होता. त्या नंतर नगरपरिषद प्रशासन तात्काळ ऍक्शन मोडवर आले आहे. मच्छिमार्केट येथील कचरा उचल करण्यासाठी दिवसभर कचरा गाडी तैनात करण्यात आली असून कचरा उचल सुरु राहणार आहे. याठिकाणी असलेल्या सेल्फी पॉईंट ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा बसवली जाणार आहे. या बरोबर बंदर जेटी येथे बंद असलेले सुलभ शौचालय नागरिक व पर्यटक यांसाठी सुरु करण्यात आले आहे.

मच्छीमार्केट याठिकाणी असलेल्या सेल्फी पॉइंट ठिकाणी मोठया प्रमाणात कचरा टाकला जात होता. हा कचरा मोकाट कुत्रे, भटकी जनावरे सर्वत्र पसरून टाकत होती. व्यापारी, नागरिक यांना याचा मोठा त्रास होत होता. यां ठिकाणवरून जाणाऱ्या पर्यटकांनाही हे दुर्गंधी व घाणीचे साम्राज्य पाहावे लागत होते. यांच्या तक्रारी थेट आमदार निलेश राणे यांच्याकडे जाताच त्यांनी त्या ठिकाणी भेट देत पाहाणी केली. त्यासोबत मच्छीमार्केट व अन्य ठिकाणी पाहाणी केली होती.



यांनंतर प्रशासन ऍक्शन मोडवर आले. हा परिसर स्वच्छ करण्यात आला. तसेच कचरा गाडी उभी करुन ठेवली जाणार आहे. दिवसातून तीन वेळा त्या गाडीत कचरा भरणा झाल्या नंतर कचरा डपिंग ग्राउंड ला नेवून टाकला जाणार. शेवटची ट्रिप रात्री दहा वाजता असणार.  याठिकाणी दिवस रात्र मोठया प्रमाणात कचरा टाकला जात असल्याने यावर लक्ष रहावे यासाठी याठिकाणी सीसीटीव्ही बसविण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.

मालवण बंदर जेटी येथील सुलभ शौचालय येथील अस्वच्छता घाणीचे व दुर्गंधीचे साम्राज्य यां बाबत आमदार निलेश राणे यांच्याकडे नागरिकांनी तक्रार केली होती. आता या ठिकाणी तातडीने साफसफाई करुन पे अँड यूझ तत्वावर सुलभ सौचलय सुरु करण्यात आले आहे. तसेच बंदर जेटी वर चांगल्या सोईसुविधा युक्त सुलभ शौचालय उभारणी करण्यात येणार आहे. याबाबत प्रशासनाला आवश्यक तो प्रस्ताव तयार करण्या बाबत सूचना आमदार निलेश राणे यांनी केल्या आहेत. अन्य समस्या सोडवण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरु आहे.

एकूणच आमदार निलेश राणे यांनी समस्यांची पाहाणी करताच प्रशासनाकडून तात्काळ कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. जनतेच्या मागणीला प्राधान्य, काम करण्याची इच्छा सोबतच प्रशासनावर पकड असली की तात्काळ रिझल्ट मिळतोच हे आमदार निलेश राणे यांनी आमदारकीच्या पहिल्याच महिन्यात मतदारसंघातील अनेक जनहिताच्या समस्या सोडवून दाखवून दिले आहे. हे पाहता लोकप्रिय आमदार निलेश राणे यांची कामगिरी दमदार अश्याच प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत असल्याचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी सांगितले.

rapan bottom