महाराष्ट्र शासनाकडून गटशिक्षणाधिकारी संजय माने यांना प्रशस्तीपत्र प्रदान
मालवण | प्रतिनिधी : यु - डायस प्लस प्रणाली २०२३- २४ मध्ये मालवण तालुक्याचे ९८.८४ टक्के ऑनलाईन कामकाज पूर्ण झाले आहे. प्रदीपकुमार डांगे,(भा. प्र. से), राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांच्यावतीने मालवण पंचायत समिती, गटशिक्षणाधिकारी संजय माने यांना प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.
मालवण तालुक्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, गटसाधन केंद्रातील सर्व कर्मचारी, सर्व शिक्षक, तंत्रस्नेही शिक्षक यांचे गटशिक्षणाधिकारी संजय माने यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.

यु - डायस प्लस प्रणालीत मालवण तालुका प्रगतीपथावर
