भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले अभिनंदन
शिर्डी : भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी आ. रवींद्र चव्हाण यांच्याकडे भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष पदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली. दरम्यान शिर्डी येथे संपन्न होत असलेल्या भाजपा महाविजयी अधिवेशनाचीही सुरुवात झाली.
यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या संघटनात्मक बैठकीत नवीन जबाबदारीबद्दल भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सहकाऱ्यांनी रवींद्र चव्हाण यांना पुष्पगुच्छ देत अभिनंदन केले.
याप्रसंगी भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, भाजपा राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे, माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार आदी उपस्थित होते.

