23 जानेवारी रोजी सोहळा निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
मालवण : मालवण तालुक्यातील कांदळगाव येथे प्रतिवर्षाप्रमाणे श्री देव रामेश्वर मंदिर कांदळगाव येथे 23 वा कलशारोहण वर्धापन दिन शुक्रवार दि. 24 जानेवारी रोजी संपन्न होणार आहे. या सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
कलशारोहण वर्धापन दिन सोहळा निमित्त 23 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता रामेश्वर भक्तनिवास कांदळगाव येथे श्री देव रामेश्वर देवस्थान परिसर देवालय विश्वस्थ मंडळ, कांदळगाव तसेच आरोग्य उपकेंद्र कांदळगाव आणि शिल्पा खोत मित्र मंडळ सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठान, मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

शुक्रवार दिनांक 24 जानेवारी रोजी सकाळी 8 पासून लघुरुद्र त्यानंतर दुपारी 12 वाजता महाआरती व दुपारी 1 पासून महाप्रसादाला सुरुवात होणार आहे. दुपारी 3 वाजता महिलांसाठी हळदी कुंकू चे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी 6 वाजता स्थानिक भजने व त्यानंतर रात्रौ ठीक 10 वाजता ग्रामदेवता पारंपारिक दशावतार नाट्य मंडळ बिडवाडी ता. कणकवली यांचा दणदणीत दशावतारी नाट्य प्रयोग सादर होणार आहे. तरी कलशारोहण वर्धापन दिन सोहळ्यात भाविकांनी उपस्थित राहून दर्शन व प्रसादाचा लाभ घ्यावा, असे असे विश्वस्त मंडळ राणे परब, मानकरी व समस्त ग्रामस्थ यांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

