मसुरे येथे पोलिसांच्या ग्रामसंवाद उपक्रमाला उत्स्फुर्त प्रतिसाद
संजय माने | पोईप : मालवण तालुक्यातील मसुरे येथे येणार्या अनोळखी लिंक्स किंवा फेक संदेश यांना प्रतिसाद देणे टाळल्यास आपली कोणतीही फसवूणक होणार नाही. त्यासाठी ग्राहकांनी जागरुक आणि सतर्क राहणे गरजेचे आहे, असे मत मालवण पोलिस निरिक्षक प्रविण कोल्हे यांनी केले.
पोलिस प्रशासनाच्यावतीने मसुरे येथे ग्रामसंवाद उपक्रम राबविण्यात आला. यावेळी उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी श्री. कोल्हे पुढे म्हणाले, गावातील मंदिरे घडताना गावातील शालेय गरजा यामध्ये विविध सुविधा निर्माण होण्यासाठी सुद्धा ग्रामस्थांनी एकत्र येऊन प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मतही व्यक्त केले. ज्येष्ठ नागरिकांच्या संघटना निर्माण करून ज्येष्ठांच्या समस्या सोडविणे सुद्धा गरजेचे आहे. समाजात आज खोटी आश्वासने, अनेक प्रलोभने दाखवून ग्रामस्थांना फसविण्याचे प्रकार सुरू आहेत परंतु अशा सर्व प्रकारातून प्रत्येकाने सावध होऊन अशा कोणत्याही आमिषाला भुलू नका असे ही ते म्हणाले.
यावेळी सौ. सरोज परब, डॉ. लोमटे, माजी सरपंच संदीप हडकर, माजी सरपंच लक्ष्मी पेडणेकर, विलास मेस्त्री, डॉ. सुधीर मेहंदळे, डॉ विश्वास साठे, राजन परब,मसुरे पोलीस श्री.विवेक फरादे, मुख्याध्यापिका सौ अर्चना कोदे, जगदीश चव्हाण, कृष्णा पाटील,विनोद सातार्डेकर , भरतगड इंग्लिश मिडीयमच्या मुख्याध्यापिका संतोषी मांजरेकर, पोलिस पाटील सुरेखा गावकर, प्राजक्ता पेडणेकर, ऐशाबी सय्यद ,प्रेरणा येसजी, अभिजित दुखंडे, साईप्रसाद बागवे, शशांक ठाकूर, नेवेश फर्नांडीस, सोमा ठाकूर,सोनल भोगले, मसुरे ग्रामविकास अधिकारी शंकर कोळसुलकर, सेवानिवृत तलाठी श्री धनंजय सावंत, पंढरीनाथ नाचणकर, तात्या हिंदळेकर, राजू मालवणकर, सचिन चव्हाण, पल्लवी नाचणकर, अशोक सांडव, बाबू येसजी, बाळू परब, यासिन सय्यद, नाझिया शेख, सुजाता पेडणेकर, विजय गिरकर, दर्शना खोत, माया मुणगेकर, आणि मसुरे ग्रामस्थ, व्यापारी, वैद्यकीय क्षेत्रातील आशा स्वयंसेविका विविध सहकारी सोसायटीचे सदस्य उपस्थित होते.

