Friday, 30 October 2026
Latest News
सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड
ruchira top

सेनापती नितेश राणे यांच्या हाती 'ड्रोनास्त्र'

सेनापती नितेश राणे यांच्या हाती 'ड्रोनास्त्र'

मच्छिमार सेल जिल्हा संयोजक रविकिरण तोरसकर यांनी मत्स्यद्योग मंत्री नितेश राणे यांचे मानले विशेष आभार

मालवण | प्रतिनिधी : महाराष्ट्रातील सागरी क्षेत्रावर देखरेख ठेवण्यासाठी देशातील पहिल्या ड्रोन प्रणालीची सुरुवात नुकतीच मत्स्यद्योग तथा बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते झाली. ड्रोन प्रणाली बाबत मच्छिमार बांधवांतून समाधान व्यक्त केले जात असून मच्छिमार सेल जिल्हा संयोजक रविकिरण तोरसकर यांनी मत्स्यद्योग मंत्री नितेश राणे यांचे विशेष आभार मानले आहेत.

अनधिकृत मासेमारी, त्याचबरोबर परप्रांतीय मच्छीमारांच्या वाढत्या झुंडशाहीला शह देण्यासाठी एक यंत्रणा अस्तित्वात येणे गरजेचे होते. तसेच सागरी सुरक्षा मजबूत करण्यासाठी ट्वेंटी फोर बाय सेवन महाराष्ट्राच्या 720 किलोमीटर लांबीच्या किनारपट्टीवर लक्ष ठेवणे आवश्यक होते. सदर दोन्ही हेतू साध्य करण्याच्या दृष्टिकोनातून मत्स्योद्योग खात्याचे सेनापती यांनी आपल्या हाती ड्रोन रुपी पाहिले अस्त्र आपल्या भात्यातून बाहेर काढले आहे. मत्स्य व्यवसाय खात्याचा कारभार सांभाळल्यानंतर गस्ती नौका आणि ड्रोन प्रणाली याबाबत तातडीने पावले उचलून भविष्यातील वेगवान निर्णयांची चाहूल मत्स्य क्षेत्राला दाखवून दिली आहे.

अतिशय उच्च तंत्रज्ञानाने युक्त असे ड्रोन महाराष्ट्राच्या सागरी किनारपट्टीवर व जलधीक्षेत्रामध्ये लक्ष ठेवणार आहे. सेनापती नितेश राणे यांनी हाती घेतलेले ड्रोनास्त्र सुरक्षा, पर्यावरण, मत्स्य अर्थात Security Environment Fisheries(SEF) या तिन्ही क्षेत्र SAFE ठेवण्यासाठी रामबाण उपाय ठरणार आहे. तसेच मत्स्य क्षेत्रातील प्रशासकीय अधिकारी यांना त्यांच्या कारभारावर लक्ष ठेवण्यासाठी अदृश्य ड्रोनची नजर देताना मंत्री नितेश राणे यांनी आपल्या सैन्याला भविष्यातील वाटचालीची दिशा दाखवली आहे. महाराष्ट्रातील पारंपारिक मच्छीमार, सागरी पर्यावरण वादी तसेच मत्स्यव्यवसाय मत्स्य उद्योग मंत्री नितेश राणे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे मच्छिमार वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे. असे मच्छिमार सेल जिल्हा संयोजक रविकिरण तोरसकर सांगितले

rapan bottom