मालवण : स्व. कै. शाम गणेश गडकरी यांच्या स्मरणार्थ प्रतिवर्षाप्रमाणे सवेश साभिनय नाट्यगीत स्पर्धा १ मार्च रोजी सायंकाळी ठीक 5.00 वाजता श्री दत्तमंदीर भरड, मालवण च्या पटांगणात आयोजित केलेली आहे. सदरची स्पर्धा ही तीन गटात घेण्यात येणार असून पहिला बालगट 12 वर्षांपर्यंत, दुसरा युवागट 13 ते 20 वर्षापर्यंत आणि तिसरा खुला गट 20 वर्षावरील स्पर्धक असे गट असणार आहेत.
सदरच्या प्रत्येक गटात पारितोषिके व तीन उत्तेजनार्थ पारितोषिके मिळून एकूण सहा पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. शिवाय ज्यांचा या पारितोषिकात समावेश नसेल परंतू या स्पर्धेत जे सातत्याने भाग घेतात. त्यातील प्रत्येक गटात दोन स्पर्धक निवडले जातील. प्रत्येक गटातील पहिल्या तीन पारितोषिकासाठी रोख रकमम व ट्रॉफी दिली जाईल, उत्तेजनार्थ पारितोषिकात फक्त रक्कम दिली जाईल.
स्पर्धेसाठी लागणारी रंगभूषा, वेशभूषा स्पर्धकाने स्वतः करायची असून जर कोणास आवश्यकता असल्यास आणि वेळीच कल्पना दिल्यास ती सेवा सशुल्क उपलब्ध करून दिली जाईल, तरी स्पर्धकांनी रत्नाकर सामंत : 8390062290 यांच्याशी संपर्क साधून 25 फेब्रुवारी पर्यंत नावनोंदणी करायची आहे,

