Friday, 30 October 2026
Latest News
सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड
ruchira top

सोशल मीडियावर आक्षेपार्ह माहिती ; डंपर व्यावसायिक एकवटले

सोशल मीडियावर आक्षेपार्ह माहिती ; डंपर व्यावसायिक एकवटले

आठ दिवसात कारवाई झाली नाहीतर कायदा हातात घेणार

डम्पर व्यावसायिकांचा प्रशासनाला अल्टिमेटम

निलेश जोशी | कुडाळ : आमदार निलेश राणे यांच्या संदर्भात आक्षेपार्ह माहिती सोशल व प्रसिद्धी माध्यमांमध्ये पसरवणाऱ्यांवर सायबर गुन्ह्याखाली गुन्हा दाखल करावा अशी मागणी वाळू आणि डंपर व्यावसायिकांनी कुडाळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. येत्या आठवड्यामध्ये ही कारवाई केली जाईल असे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे यांनी सांगितले. जर आठ दिवसात कारवाई झाली नाही तर आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल असे वाळू व्यवसायिकांनी सांगितले.
कुडाळ एमआयडीसी येथे आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत सर्व डंपर तसेच वाळू व्यवसायिकांची बैठक झाली होती. या बैठकीमध्ये वाळू लिलाव संबंधित काही त्रुटी तसेच काही व्यवसायाबाबत असलेल्या समस्यांवर चर्चा करण्यात आली परंतु या बैठकीमधील माहिती चुकीच्या आशयाने सोशल मीडिया व प्रसिद्धी माध्यमातून माहिती पसरवली गेली. पसरवलेली माहिती चुकीची आणि प्रतिमा मल्लीन करणारी आहे. तरी अशा प्रकारची आक्षेपार्य माहिती पसरवणाऱ्या विरोधात सायबर क्राईम नुसार गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली. यावेळी व्यावसायिक व नगरसेवक अभी गावडे यांनी सांगितले की, संबंधितांवर येत्या आठ दिवसात कारवाई झाली नाही तर पुढील पाऊल आम्ही उचलू, लवकरात लवकर कारवाई करा. आम्हाला कायदा हाती घेऊ देऊ नका. असे सांगितले. याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे यांनी सांगितले की, आपण दिलेल्या निवेदनाद्वारे योग्य ती कारवाई केली जाईल, यामध्ये दोषींवर कारवाई करू असे सांगितले यावेळी वाळू डंपर चालक संघटनेचे अध्यक्ष समीर दळवी, अभी गावडे, प्रसन्नजीत दळवी, चेतन पडते, देवेंद्र नाईक, मुन्ना दळवी, आबा धडाम, सुशील कदम आदी वाळू व डंपर व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

rapan bottom