ओरोस : पद्मश्री रमाकांत आचरेकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, ओरोस, येथे रविवार १२ जानेवारीला स्वामी विवेकानंद यांचा जयंती दिवस राष्ट्रीय युवा दिन' म्हणून साजरा करण्यात येणार असल्याची माहिती शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्यावतीने देण्यात आली.
जिल्हयातील विविध कौशल्यांना युवकांच्या तसेच व गुणांना वाव मिळावा प्रोत्साहन मिळावे, यासाठी या संस्थेतून व्यवसाय अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेल्या व यशस्वी उद्योजक म्हणून नावरुपास आलेल्या माजी प्रशिक्षणार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे. सन २०२४-२५ मधील संस्थेतील क्रीडास्पर्धा, तंत्रप्रदर्शन, वक्तृत्व, रांगोळी स्पर्धा यामध्ये प्राविण्य मिळविलेल्या प्रशिक्षणार्थ्यांचा गौरव करण्यात येणार आहे. राष्ट्रीय युवा दिनाच्या या कार्यक्रमाला संस्थेतील आजी व माजी प्रशिक्षणार्थी तसेच त्यांच्या पालकांनी सकाळी १० वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्था, ओरोसचे प्राचार्य मोहारे यांनी केले आहे.

