Friday, 30 October 2026
Latest News
सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड
ruchira top

वाघवणे कर्ली खाडी येथे सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खननावर कारवाई व्हावी…

वाघवणे कर्ली खाडी येथे सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खननावर कारवाई व्हावी…

वाघवणे ग्रामस्थांचे तहसील प्रशासनास निवेदन

मालवण : वाघवणे कर्ली खाडी येथे अवैध वाळू उत्खनन मागील काही दिवसांपासून सुरू आहे. त्यामुळे सुरू असलेले अवैध वाळू उत्खनन थांबवून त्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी असे मागणी निवेदन वाघवणे येथील ग्रामस्थांनी मालवण तहसील कार्यालयात दिले आहे.

वाघवणे कर्ली खाडीत शासनाने बांधलेल्या कर्ली पुलानजिक आमची घरे, मांगर, भातशेती, तसेच माडबागायती व इतर मिळकती आहेत, सद्यस्थितीत वाघवणे येथे रेतीगट D5 तसेच कर्ली पूलापासून 600 मीटरच्या आतच वाळू उत्खनन सुरू आहे, याची कल्पना आपल्याला यापूर्वीच्या निवेदनात दिलेली आहे.

यावर उपाययोजना म्हणून आपण महसूल विभागातर्फे एक पथक देवली येथे तैनात केले होते, परंतु याचा काहीसा परिणाम या अवैध वाळू उत्खननावर झाला नाही, या महसूल अधिकाऱ्यांच्या समक्षच वाळू उत्खनन चालू होते आणि हे अवैध वाळू उत्खनन सुरूच आहे. तसेच रात्रीच्या वेळी तर कर्ली पुलापासून 300 मीटर वर हे अवैध वाळू उत्खनन सुरू आहे.

काही दिवसापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आपणास या अवैध बेकायदा वाळू उत्खननाद्वारे कर्ली पुलास धोका निर्माण झाला आहे, त्यामुळे हे वाळू उत्खनन कर्ली पूलापासून किमान 1 किलोमीटर बाहेर करण्याच्या सूचना संबंधित ठेकेदाराला कराव्यात, असे आपणास कळविण्याचे समजले, असे असतानाही सध्या कर्ली पुलापासून अवघ्या 300 मीटर वर हे वाळू उत्खनन चालू असताना आपणाकडून यावर असभ्य दुर्लक्ष होत आहे, कर्ली पूलाच्या बाबतीत मोठी दुर्घटना होण्याची वाट प्रशासन पाहत आहे का?

या वाळू उत्खननाद्वारे खार बंधारा पूर्णतः खचून गेला आहे, त्यामुळे खार बंधाऱ्यावर अवलंबून असलेले शेती, माड बागायती तसेच लोकवस्ती इत्यादींना धोका निर्माण झाला आहे. तसेच पिण्यायोग्य पाण्याच्या विहिरींना सुद्धा धोका निर्माण झाला आहे, असे सदर निवेदनात म्हटले आहे.

त्यामुळे या गंभीर बाबींचा विचार करून या अवैध वाळू उत्खननावर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे वाघवणे ग्रामस्थांनी केली आहे

rapan bottom