Friday, 30 October 2026
Latest News
सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड
ruchira top

आमदार निलेश राणे यांनी मालवण शहराचा केला स्पॉट पंचनामा

आमदार निलेश राणे यांनी मालवण शहराचा केला स्पॉट पंचनामा

मालवण शहराची रात्री केली पाहाणी | नागरिकांच्या समस्या घेतल्या जाणून

मालवण | प्रतिनिधी : आमदार निलेश राणे यांनी मालवण शहराचा बुधवारी रात्री स्पॉट पंचनामा केला. मालवण शहराची रात्री पाहाणी करतं नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.

मालवण बंदर जेटी येथील बंद लाईट, मालवण मच्छी मार्केट परिसरातील अस्वच्छता, कचऱ्याचे ढीग, सेल्फी पॉईंट ची दुरावस्था, कचरा व्यवस्थापन मशीन व पर्यटकांसाठी बंदर जेटीवरील प्रसाधनगृहाची पहाणी केली. दुरवस्थेत असलेल्या मालवण बंदर जेटी परिसरात चांगल्या सुविधा निर्माण करण्यासाठी ही पहाणी करण्यात आली. बंदर जेटी स्वच्छ सुरक्षित आणि आकर्षक बनविण्यासाठी काय करता येईल याची माहिती घेतली.

तसेच मालवण नगरपरिषद कर्मचारी वसाहत येथे नवी इमारत उभारणी सुरु असून ही इमारत उभारणी रखडली आहे. याबाबत पाहाणी केली व माहिती जाणून घेतली. यां सर्वा बाबत प्रशासनाशी चर्चा करून योग्य त्या सूचना देणार असल्याचे आमदार निलेश राणे यांनी सांगितले.

यावेळी शिवसेना जिल्हा संघटक माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर, जेष्ठ पत्रकार नंदकिशोर महाजन, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, शिवसेना विधानसभा प्रमुख बबन शिंदे, उपजिल्हाप्रमुख विश्वास गांवकर, तालुकाप्रमुख राजा गांवकर, माजी जिल्हा सचिव किसन मांजरेकर, युवतीसेना जिल्हाप्रमुख सोनाली पाटकर, युवामोर्चा शहरप्रमुख ललित चव्हाण, निषय पालेकर, अमोल केळुसकर यांसह अन्य पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

नागरिकांमधून समाधान व्यक्त

मालवण शहरातील कचरा समस्या, बंद स्ट्रीट लाईट, मोकाट जनावरे आदी समस्या बाबत आमदार निलेश राणे यांनी प्रत्यक्ष पाहाणी करत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. याबाबत नागरिक व व्यापारी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात आले. आमदार निलेश राणे यांनी लक्ष टाकले म्हणजे निश्चितच योग्य ती कार्यवाही होणार. अशी भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली.

rapan bottom