Friday, 30 October 2026
Latest News
सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड
ruchira top

गोळवण येथे काजू शेतीशाळा संपन्न

गोळवण येथे काजू शेतीशाळा संपन्न

संजय माने | पोईप : गावात केवळ रस्ते, इमारती व मूलभूत भौतिक सुविधा निर्माण केल्याने गावचा विकास होत नाही. यां सुविधा शेती मालाच्या उत्पादनास पूरक आहेत. गावातील शेतकऱ्यांच्या शेतमाल उत्पादनात वाढ झाल्यावरच खऱ्या अर्थाने गावचा विकास होईल, शेती उत्पादन वाढविण्यासाठी ग्रामपंचायत, कृषी विभाग व गावाने एकत्र येऊन प्रयत्न केले, पाहिजेत असे प्रतिपादन मालवण तालुका कृषी अधिकारी श्री. ई. ल. गुरव यांनी गोळवण सावरवाडी येथे बोलताना केले.

मालवण तालुक्यातील गोळवण - सावरवाडी येथे श्री. सत्यविजय साबाजी पालव यांच्या काजू फळबागेमध्ये HORTSAP अंतर्गत काजू शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरुवात तालुका कृषी अधिकारी श्री. ई. ल. गुरव यांच्या हस्ते काजू रोपाचे पूजन करून तसेच त्याची लागवड करून करण्यात आले.

यावेळी तालुका कृषी अधिकारी श्री. गुरव यांनी काजू मोहर संरक्षणा बद्दल शेतकऱ्यांना प्रत्यक्ष काजू फळबागे मध्ये विस्तृतरित्या मार्गदर्शन केले. तसेच कृषी मंडळ अधिकारी श्री. आर. एस. चव्हाण व कृषि पर्यवेक्षक श्री. डी. के. सावंत यांनीही शेती विषयावर मार्गदर्शन केले. तसेच गोळवण- डिकवल- कुमामे ग्रामपंचायतीचे सरपंच श्री. सुभाष लाड यांनीही विचार मांडले.

या कार्यक्रमास उपसरपंच शरद मांजरेकर, ग्रामपंचायत सदस्य प्राजक्ता चिरमुले, साबाजी गावडे , ग्रामसेविका शेलटकर तसेच भाई चिरमुले, संतोष चव्हाण, अमित घाडी, नामदेव चव्हाण, नामदेव परब, सुंदर लाड, गजानन गावडे मनोहर परब, गणेश तावडे, रामकृष्ण नाईक आदी व इतर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश पाताडे यांनी केले.

rapan bottom