Friday, 30 October 2026
Latest News
सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड
ruchira top

रांगणा तुळसुलीतील अतिदुर्गम शाळेला रोटरी कडून संगणक संच

रांगणा तुळसुलीतील अतिदुर्गम शाळेला रोटरी कडून संगणक संच

कदमवाडी शाळेसाठी रोटरी क्लब ऑफ कुडाळचा पुढाकार

ग्रामीण भागातील शाळेला भेट देणे हि रोटरीची सेवा आहे - अध्यक्ष डाॅ संजय केसरे

निलेश जोशी | कुडाळ : कुडाळ तालुक्यातील अतिदुर्गम जि.प.प्रा.शाळा रांगणातुळसुली कदमवाडी शाळेला रोटरी क्लब ऑफ कुडाळ कडून संगणक संच प्रदान करण्यात आला. ग्रामीण भागातील शाळेला भेट देण्याचे भाग्य मिळणे हिच खरी रोटरीची सेवा आहे असे मत रोटरी क्लब ऑफ कुडाळचे अध्यक्ष डाॅ संजय केसरे यांनी व्यक्त केले.
यावेळी रांगणातुळसुली सरपंच नागेश आईर, रोटरी क्लब ऑफ कुडाळ चे माजी अध्यक्ष राजन बोभाटे,दिनेश आजगावकर, सचिन मदने, ग्रा.पं.सदस्या सौ जयश्री कोळेकर, ज्येष्ठ नागरिक महादेव सावंत, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शिवराम सावंत, उपाध्यक्ष अरविंद सावंत, अंगणवाडीसेविका व मदतनिस, ग्रामस्थ, पालक,मुख्याध्यापक राजेश गुरव, सहशिक्षक प्रसाद मेस्त्री आदी उपस्थित होते.
रोटरी क्लब ऑफ कुडाळ सारखी आंतरराष्ट्रीय सेवाभावी संस्था विविध समाजपयोगी उपक्रम राबवते, गोरगरीब लोकांना सुविधा उपलब्ध करून देते हे कार्य कौतुकास्पद आहे असे गौरवोद्गार सरपंच नागेश आईर यांनी व्यक्त केले.रोटरी सारखी सेवाभावी संस्था काय काम करते हे ग्रामीण व दुर्गम भागातील लोकांना समजणे आवश्यक आहे यासाठीच ग्रामीण भागात सेवा देणे हा मुख्य उद्देश असल्याचे रोटरी सेवा प्रतिष्ठान कूडाळचे राजन बोभाटे यांनी व्यक्त केले.
रांगणातुळसुली शाळेच्यावतीने सरपंच नागेश आईर यांच्याहस्ते रोटरी क्लब ऑफ कुडाळ चे अध्यक्ष डाॅ संजय केसरे यांचा शाल, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत रांगणातुळसुली कदमवाडी शाळेचा समूहगीत स्पर्धेत द्वितीय क्रमांक आल्याबद्दल रोटरी क्लब ऑफ कुडाळ कडून मुख्याध्यापक राजेश गुरव, सहशिक्षक प्रसाद मेस्त्री यांचा सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन राजेश गुरव तर आभार सहशिक्षक प्रसाद मेस्त्री यांनी केले.

rapan bottom