Friday, 30 October 2026
Latest News
सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड
ruchira top

शासकीय अभिविक्षा मंडळाची बैठक संपन्न

शासकीय अभिविक्षा मंडळाची बैठक संपन्न

जिल्हा कारागृहाच्या समस्या सोडविण्याला प्राधान्य

जिल्हा न्यायाधीश, जिल्हाधिकारी आणि अपर पोलिस अधीक्षकांची संयुक्त पाहणी

दोन्ही कारागृहांच्या समस्यांबाबत घेतला आढावा ; बंद्यांशी साधला संवाद

सिंधुदुर्ग :महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशाप्रमाणे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश हेमंत गायकवाड, जिल्हाधिकारी अनिल पाटील, अपर जिल्हा पोलिस अधीक्षक कृषिकेश रावले, उपविभागीय अधिकारी हेमंत निकम, विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती संपुर्णा कारंडे यांनी जिल्हा कारागृहास संयुक्त भेट देऊन पाहणी केली. यावेळी कारागृहात बंदिवानांना मिळणाऱ्या जेवणाची, निवासाची तसेच उपहारगृहाची पाहणी केली. कारागृहातील बंदीवानांची नियमित आरोग्य तपासणी करावी, त्यांना सकस आहार देण्यात यावा अशा सूचना कारागृह प्रशासनाला देण्यात आल्या. यावेळी बंदिवानांशी संवाद देखील साधला.

या भेटीनंतर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश हेमंत गाकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत शासकीय अभिविक्षा मंडळांची बैठक पार पडली. या बैठकीत कारागृह अधीक्षक बी.एम. लटपटे आणि सावंतवाडी कारागृह अधीक्षक श्री एकशिंगे यांनी कारागृहाबद्दल सविस्तर माहिती दिली. कारागृह परिसरात भाजीपाल्याची सेंद्रीय शेती करण्यात येते. बंदिवानांच्या आहारात देखील याच भाजीपाल्याचा समावेश होत असल्याचे त्यांनी सांगितले. बंदिवानांच्या नियमित आरोग्य तपासणीसाठी कारागृहात आरोग्य अधिकारी आणि परिचारीका कायमस्वरुपी उपलब्ध करुन द्यावी. कारागृहास मंजूर झालेला शस्त्रसाठा ठेवण्याकरिता व कारागृह कर्मचारी यांच्याकरिता सुरक्षा रक्षक खोली, शस्त्रसाठा जतन करण्याकरिता शस्त्रगार व बंद्यांच्या भेटीसाठी येणाऱ्या नातेवाईकांसाठी प्रतिक्षालय, कारागृह ते गरुड सर्कल ओरोस या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करावे, कारागृहाच्या तटबंदीच्या आतील व बोहरील रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करावे अशीही मागणी श्री लटपटे यांनी समीती समोर केली.

rapan bottom