Friday, 30 October 2026
Latest News
सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड
ruchira top

मच्छरमुक्त कुडाळ शहरासाठी सर्व नगरसेवक एकवटले

मच्छरमुक्त कुडाळ शहरासाठी सर्व नगरसेवक एकवटले

शहरात गप्पी मासे पैदास केंद्राची उभारणी

शहरातील पाणथळ भागात सोडणार गप्पी मासे

निलेश जोशी | कुडाळ : कुडाळ शहर मच्छरमुक्त करण्यासाठी आता कुडाळ नगर पंचायतचे सर्व नगरसेवक एकवटले आहेत. मच्छरमुक्तीसाठी लागणारे गप्पी माशांचे पैदास केंद्र कुडाळ शहरात सार्वजनिक शौचालयाच्या बाजूला उभारण्यात आले आहे. कोणताही खर्च न करता टाकाऊपासून गप्पी माशांसाठीच्या पाण्याच्या टाक्या उभारण्यात आल्या असून अशा प्रकारचा जिल्ह्यतील हा पहिलाच उपक्रम आहे. आज या गप्पी मासे केंद्रातील मासे रेल्वेस्टेशन मार्ग आणि तुपटवाडी येथील ओहोळात सोडण्यात आले.


कुडाळ शहरात दिवसेंदिवस डासांची संख्या वाढली आहे. या डासांची संख्या कमी करण्यासाठी कुडाळ नगरपंचायतीकडून 'डासमुक्त कुडाळ' अभियानातर्गत येथील अनंत मुक्ताई हॉटेल सर्वाजनिक शौचालय गृहानजीक गप्पी मासे पैदास केंद्र उभारण्यात आले आहे. या पैदास केंद्रातील मासे शहरातील तुपटवाडी, रेल्वे स्थानक रस्त्या नजीक ओहाळामधील पाण्यात सोडून या केंद्राचा शुभारंभ आज नगरपंचायत करण्यात आला. या कार्यक्रमाला सत्ताधारी व विरोधक उपस्थित असल्यामुळे शहरातील चांगल्या कामांसाठी सत्ताधारी-विरोधक एकत्र आल्याचे चित्र दिसले.


कुडाळ नगरपंचायतीच्या वतीने 'डासमुक्त कुडाळ' अभियानातर्गत शहर मच्छर मुक्त करण्यासाठी गप्पी मासे आणले जातील अशी माहिती आरोग्य सभापती मंदार शिरसाट यांनी पत्रकार परिषदेत दिली होती. मात्र त्यानंतर भाजपचे गटनेते विलास कुडाळकर यांनी याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थितीत करीत या गप्पी माशांमध्ये सुद्धा घोटाळा होऊ शकतो हे गप्पी मासे मोफत मिळतात असे सांगितले होते. त्यानंतर नगरपंचायत प्रशासनाने आरोग्य विभागाकडे गप्पी मासे मोफत मिळावे अशी मागणी केली होती. तसेच कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने शहरातील टाकाऊ कचराकुंड्यांपासून गप्पी मासे पैदास केंद्र कर्मचाऱ्यांनी स्वखर्चातून निर्माण केले. या पैदास केंद्रात याठिकाणी पाच कचराकुड्यात गप्पी मासे पैदास करण्यात आले आहेत. कर्मचाऱ्यांच्या या प्रयत्नाला हातभार लावावा म्हणून भाजपा गटनेता विलास कुडाळकर यांनी गप्पी मासे पैदास केंद्राला आवश्यक असणारे ऑक्सिजनचे साहित्य दिले आहे.
दरम्यान या पैदास केंद्रामध्ये गप्पी मासे प्रशासनाने सोडल्यानंतर बुधवारी हे गप्पी मासे शहरातील काही नाल्यांमध्ये सोडण्यात आले. यावेळी प्रभारी नगराध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष किरण शिंदे, माजी नगराध्यक्षा अक्षता खटावकर, आरोग्य व स्वच्छता समिती सभापती मंदार शिरसाट, माजी नगराध्यक्षा आफरीन करोल,नगरसेविका ज्योती जळवी, सई काळप, भाजप गटनेते विलास कुडाळकर, स्वच्छता निरीक्षक संदीप कोरगावकर, मुकादम दीपक कदम, संजय सोनवडेकर उपस्थित होते.


मंदार शिरसाट म्हणाले, कुडाळ शहरामध्ये मच्छरांची संख्या वाढल्यानंतर नगरपंचायतीमार्फत गप्पी मासे पैदास केंद्र तयार करून मासे सोडण्याचा संकल्प करण्यात आला. त्या अनुषंगाने मुळदे कृषीविद्यापीठामार्फत माहिती घेण्यात आली. त्या शहरात टाकाऊ वस्तूतून नगरपंचायतीचा एकही रुपया खर्च न करता गप्पी माशांचे पैदास केंद्र नगरपंचायतीच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या विशेष सहकार्यातून हा उपक्रम सुरू करण्यात आला. वर्षभरातून या पैदास केंद्रातून किमान वीस ते पंचवीस हजार माशांची निर्मिती करण्याचा आमचा संकल्प आहे. तसेच पुढच्या पंधरा दिवसानंतर एक वार ठरवून या गप्पी माशांचे शहरातील नागरिकांना मोफत स्वरूपात वाटप केले जाणार आहे. आज या उपक्रमाचा शुभारंभ म्हणून पहिल्यांदा सुरुवातीला दोनशे मासे ओहळात सोडण्यात आले. ज्याठिकाणी डबकी, मच्छर पैदास होते त्याठिकाणी हे मासे सोडून शहरातील डासांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न आहे. नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांच्या व सर्व नगरसेवकांच्या विशेष सहकार्यातून आपण हा उपक्रम राबवित असल्याचे श्री. शिरसाट यांनी सांगितले.
किरण शिंदे म्हणाले, कुडाळमध्ये मच्छरांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून त्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी आपण हा उपक्रम राबवित आहोत. या उपक्रमात नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांचे मोठे सहकार्य आहे. आताच गप्पी मासे पैदास केंद्र सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे भविष्यात डासांचे प्रमाण कमी करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे, असे त्यांनी सांगितले.


विलास कुडाळकर म्हणाले, नगपंचायतीचा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे. या उपक्रमाला आमचा कोणत्याही प्रकारचा विरोध नव्हता. आज जो उपक्रम सुरु करण्यात आला तो न. पं. च्या कर्मचाऱ्यांच्या सहकार्यातून व परिश्रमातून करण्यात आला. त्यांच्यामुळे हे पैदास केंद्र उभे राहिले आहे. नगरपंचायतीचा एकही रुपया खर्च न करता गप्पी मासे व पैदास केंद्र निर्माण झाले आहे. आम्ही विरोध केला होता तो या संभाव्य होणाऱ्या खर्चाला शहराच्या कोणत्याही चांगल्या कामांमध्ये आमचा विरोध असणार नाही. आम्ही त्यावेळी गप्पी माशांचा विषय विरोधात मांडलो असलो तरी आता कोणतीही रक्कम या उपक्रमासाठी नगरपंचायतीची खर्च नव्हता हा उपक्रम होत असल्यामुळे आम्ही सर्व मिळून सहकार्य करीत आहोत. सत्ताधारी आणि विरोधक असे न मानता शहराच्या चांगल्या कामासाठी एकत्र सोबत राहू असे त्यांनी सांगितले.
मच्छरमुक्त कुडाळ शहरासाठी सर्व नगरसेवक एकवटले आहेत. त्यामुळे शहर मच्छरमुक्त तर होईलच पण चांगल्या कामामध्ये राजकारण न करता कुडाळ शहरासाठी सर्वानी एकत्र येऊन काम करण्याचा सकारात्मक संदेश सुद्धा समाजात पोहोचला आहे.

rapan bottom