Friday, 30 October 2026
Latest News
सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड
ruchira top

परिवर्तनासाठी आतापासून संघर्ष केला पाहिजे : वैभव नाईक

परिवर्तनासाठी आतापासून संघर्ष केला पाहिजे : वैभव नाईक

सक्षम विरोधी पक्ष म्हणून आपण उभे राहणे गरजेचे -सतीश सावंत

शिवसेना देवगड तालुका कार्यकारिणीची बैठक संपन्न

देवगड : निवडणुकीचा निकाल आपल्या बाजूने लागला नसला तरी आपण सातत्याने जनतेचे काम करीत राहिले पाहिजे. लोकांमध्ये मिसळून त्यांचे प्रश्न जाणून घेऊन ते सोडविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांच्या भक्कमपणे पाठीशी राहिले पाहिजे.आजची परिस्थिती उद्या बदलेल मात्र परिवर्तनासाठी आतापासून संघर्ष केला पाहिजे. त्यासाठी आम्ही सर्वजण आपल्यासोबत आहोत असा विश्वास माजी आमदार वैभव नाईक यांनी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिला.


शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या देवगड तालुका कार्यकारिणीची बैठक आज इंद्रप्रस्थ हॉल देवगड सातपायरी येथे संपन्न झाली. यावेळी कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, तालुकाप्रमुख मिलिंद साटम, नगरसेवक बुवा तारी, युवासेना तालुकाप्रमुख गणेश गावकर,हर्षा ठाकूर,संतोष तारी, वर्षा पवार,सरपंच मेनिका पुजारे,रमाकांत राणे,विशाल मांजरेकर, संदीप ढोलकर,सरपंच पूर्वा जाधव, सुनील जाधव, बाजीराव जाधव, सचिन खडपे, यदुनाथ ठाकूर, सरपंच दीपक कदम, मंगेश पाठक,फरीद काझी आदींसह शिवसेना पदाधिकारी, व शिवसैनिक उपस्थित होते.


सतीश सावंत म्हणाले,जनतेची छोटी मोठी कामे करणे, वैयक्तीत योजनांचा लाभ मिळवून देणे हे काम अविरतपणे आपण सुरु ठेवले पाहिजे. येणाऱ्या काळात पदाधिकारी कार्यकर्त्यांची एकजूट टिकवून ठेवणे आणि जनतेच्या प्रश्नावर आवाज उठविण्यासाठी सक्षम विरोधी पक्ष म्हणून आपण उभे राहणे गरजेचे आहे. तर जनता नक्की आपल्याला साथ देईल असे सांगितले.

rapan bottom