शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ताजी सामंत वाढदिवस अभिष्टचिंतन…!
शुभेच्छुक : श्री. सुनील घाडीगावकर | माजी सभापती, मालवण
काही माणसे जन्माला येतातच ती समाजासाठी. यांच्याकडे स्वार्थ नसतो. असतो तो फक्त सेवाभाव. म्हणूनच अशी माणसे आपले अढळ स्थान जनतेच्या हृदयात निर्माण करतात. सर्वसामान्यांसाठी आधारवड ठरणारे सिंधुदुर्गातील असेच एक दातृत अर्थात दत्ता सामंत हे होय…! राणे साहेबांचा कार्यकर्ता ही ओळख अभिमानाने मिरवणारे दत्ता सामंत निश्चितच राजकीय पटलावर आदर्श ठरतात.

निसर्गसंपन्न घुमडे गावचे सुपुत्र असलेले दत्ताजी सामंत हे नाव त्याच्या दातृत्वासाठी जेवढे परिचित आहे, तसेच सिंधुदुर्गच्या राजकीय पटलावर एक झंजावाती वादळ म्हणून परिचित आहे. यासोबतच एक यशस्वी उदोजक म्हणूनही त्यांचा नावलौकक आहे.
प्रचंड मेहनत आणि अभ्यासू वृत्ती या बळावर सामंत यांनी यशाला गवसाणी घातली. धार्मिक कार्यातही ते नेहमीच पुढे असतात. अनेक मंदिरांचे स्वखर्चाने केलेले जीर्णोद्धार अन भजनकलेतून केलेली ईश्वरसेवा दत्ताजी यांची धार्मिकता व कलेची आवड स्पष्ट करते.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायणराव राणे यांचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून दत्ताजी सामंत यांनी सिंधुदुर्गच्या राजकीय पटलावर इमाने इतबारे काम केले, करत आहेत. राणे साहेबांच्या आदेशाने कार्यकर्त्यांची फौज उभी करण्यात, निवडणुकीची रणनीती आखण्यात आणि विरोधकांचे चक्रव्यूह भेदून विजयाची पताका फडकवण्यात दत्ता सामंत यांचा हातखंडा राहिला. जिल्हास्तर तसेच राज्यस्तरीय अनेक पक्षीय पदाना न्याय देण्याचे काम सामंत यांनी यशस्वीपणे केले.
राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली काम करतं असताना अनेकांना सरपंच, नगरसेवक, नगराध्यक्ष, जिप व पस सदस्य ते सभापती, अध्यक्ष बनवण्यात मोलाची भूमिका बजावणारे दत्ताजी सामंत 'परिसस्पर्श' व्यक्तिमत्व म्हणून अनेकांच्या हृदयात आहेत.
राजकारण, उद्योग व्यवसाय यात सतत व्यस्त असणाऱ्या सामंत यांच्यातील समाजकार्याचा झरा अखंडपणे वाहत असतो. सर्वसामान्य गोरगरीब जनतेला केलेल्या मदतीचा आलेख सतत उंचावणारा असला तरी यांची नोंद दिलेल्या हातानी कधी ठेवली नाही. हाच दत्ता सामंत यांचा दिलदारपणा आहे. मदत ही मदत असली पाहिजे तिचा गाजावाजा न करता लाखोंचे दान करणाऱ्या दत्ता सामंत यांची हीच सेवाभावी वृत्ती इतरांच्या हृदयात अढळ स्थान निर्माण करणारी ठरते.

विध्यार्थ्यांना मदतीचा हात असो अथवा आधुनिक शिक्षणासाठी शाळा डिजिटल असो. दत्ताजी अग्रेसर राहिले. आजारी व्यक्तींना मदत अथवा अपघातग्रस्तांना आधार यासाठी सामंत देवदूत ठरले. गरजवंत कधीही रिकामी हातांनी त्यांच्या समोरून माघारी परतला नाही.
अनेक ग्रामीण भागात, जनता व कार्यकर्त्यांशी त्यांची कनेक्टिव्हिटी कायम जोडलेली आहे. आजही कुठल्या कार्यक्रमात दत्ता सामंत यांची एन्ट्री झाली की तोच दरारा आणि कार्यकर्त्यांचा गराडा कायम असतो. म्हणूनच दत्ता सामंत हे जनतेला भावलेले लोकनेते ठरतात. दत्ताजी जनतेच्या हृदयात कालही होता…. उद्याही असाल…. लोकशाहीत जनता सार्वभौम आहे… त्याच जनतेचा हृदयात तुम्ही आहात…. राणे साहेबांचा सदैव कार्यकर्ता ही तुमची भावना सर्वकाही सांगून जाते.
काही महिन्यांपूर्वी राणे साहेबांचा आशीर्वाद घेऊन दत्ताजी सामंत शिवसेनेत प्रवेशकर्ते झाले. त्यावेळी मुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदे यांनी आपल्याकडे जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी दिली. त्या नंतर पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार निलेश राणे साहेबांच्या विजयातील योगदान बहुमोल राहिले. आमदार निलेश राणे साहेबांनीही याचा विशेष उल्लेख केला. यांचवेळी दत्ता सामंत म्हणाले माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण म्हणजे निलेश राणे साहेब आमदार झाले तो क्षण होय. ही दत्ता सामंत यांची भावना निश्चितच त्यांचा समर्पण भाव स्पष्ट करणारी आहे.
एकूणच आपला जिवनप्रवास यशाची शिखरे सर करणारा राहो. जनतेतीलही तुमचे ढळस्थान कायम राहो… राजकीय व उदोग क्षेत्रातील तुमची वाटचाल यापुढेही यशस्वीपणे बहरत राहो. सर्वसामान्यांची सेवा तुमच्या हातून नित्यघडो. तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना निरोगी दीर्घायुष्य लाभो. हीच ईश्वर चरणी प्रार्थना. वाढदिवस अभिष्टचिंतन….!

