Friday, 30 October 2026
Latest News
सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड
ruchira top

आमदार निलेश राणे यांच्या हस्ते ४३ कोटी निधीतील पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन

आमदार निलेश राणे यांच्या हस्ते ४३ कोटी निधीतील पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन

मालवण शहर पाणीपुरवठा योजना वृद्धिंगत होणार

मालवण | प्रतिनिधी : दहा वर्षे हा मतदारसंघ ओसाड पडला होता. आता त्याला नवीन दर्जा देण्यासाठी भरपूर काम करायचे आहे. आज 43 कोटी निधीतील एक योजनेचा शुभारंभ झाला. 24 महिन्यांमध्ये त्याचं काम पूर्ण होईल याची खात्री तुम्हाला या व्यासपीठावरून देतो. अनेक विकासकामे प्रस्तावित आहेत, प्रगतीपथावर आहेत. आपल्याला मतदारसंघात जे काम करायचे, ते दर्जेदार करायचे आहे. राज्यात मालवण-कुडाळ मतदारसंघाचे नाव घेतलं पाहिजे, असं काम माझ्याकडून घडेल. असे प्रतिपादन आमदार नीलेश राणे यांनी मालवण येथे केले.

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान राज्यस्तर अभियानातून मालवण शहराची जलवाहिनी अर्थात मालवण शहर पाणीपुरवठा योजना वृद्धिंगत होणार आहे. सुमारे ४३ कोटी रुपये रकमेच्या नळयोजनेचे विस्तारीकरण व नूतनीकरण होणार आहे. आमदार नीलेश राणे यांच्या यशस्वी पाठपुराव्याने महायुती शासनाच्या माध्यमातून ही योजना मंजूर झाली होती. पाणीपुरवठा योजना कामाचे भूमिपूजन आमदार राणे यांच्या हस्ते सोमवारी सकाळी कुंभारमाठ येथे मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. तसेच स्वागताचा कार्यक्रम भरड येथील नगरपरिषद वाहनतळ येथे करण्यात आला.

यावेळी मुख्याधिकारी जिरगे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी शिवसेना उपनेते संजय आग्रे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, शिवसेना जिल्हा संघटक महेश कांदळगावकर, मतदारसंघप्रमुख बबन शिंदे, उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, राजन वराडकर, गणेश कुशे, अशोक सावंत, अंजना सामंत, ऋषिकेश सामंत, आप्पा लुडबे, जगदिश गावकर, उपजिल्हाप्रमुख विश्वास गावकर, बाळू नाटेकर, माजी जिल्हा सचिव किसन मांजरेकर, युवती सेना जिल्हा प्रमुख सोनाली पाटकर, पूजा येरलकर, निश्चय पालयेकर, अभिषेक इन्फ्राचे अभिषेक घाग, निशांत घाग, विनोद भूरण, दत्तप्रसाद पाटकर आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी मनोगते व्यक्त केली. सूत्रसंचालन अक्षय सातार्डेकर यांनी केले.

मालवण शहराला पाणीपुरवठा करणारी योजना माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे यांनी १९९९ साली विशेष बाब म्हणून मंजूर करून आणली. धामापूर तलावातून पाणी उपसा करून मालवण शहरापर्यंत आणली गेलेली ही पाणीपुरवठा योजना महत्वपूर्ण ठरली. शहरातील अनेक भागात उन्हाळ्यात निर्माण होणारी पाणीटंचाई, किनारपट्टी भागात असलेली क्षारयुक्त पाण्याची समस्या यावर पाणीपुरवठा योजना वरदान ठरली. या काळात पाणीपुरवठा नळकनेक्शन वाढत गेले. नागरिकांसाठी ही योजना जलवाहिनी बनली. योजनेवर दुरुस्ती करण्यात आली. कालांतराने आता जीर्ण झालेल्या या योजनेच्या नूतनीकरणासाठी मागील काही काळापासून पाठपुरावा करण्यात येत होता. अखेर नवी योजना मंजूर झाली आहे, असे मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी स्पष्ट केले. - त्यांनी व्हीडिओद्वारे योजनेचे काम कशाप्रकारे होणार, याचीही माहिती दिली.

आमदार निलेश राणे म्हणाले, जेव्हा शहराचा आढावा घेतला, त्यावेळी असे आढळले, की अनेक वर्षांपासून छोटी-छोटी कामे अडकली होती. हे काम तसं मोठे आहे. ४३ कोटी तरतूद आहे. पण लहान-लहान कामं आपण चर्चेच्या माध्यमातून सोडवू शकतो. ती व्हायला हवी होती पण ती झाली नाहीत. जे पाठबळ प्रशासनाला हवं असतं, ते तुम्हाला देणार. तुम्ही कामाला सुरुवात करा, हे काम कुठेही अडकणार नाही हा आमदार या नात्याने मी तुम्हाला शब्द देतो, असं सांगून अनेक कामं आपण मार्गी लावतो. काम करायचं, तर आपण २१ व्या शतकात राहतो हे डोक्यात ठेवून आपण काम केलं पाहिजे. नुसतं कोणी तरी तरतुद करून ठेवलेली आहे, यावर चर्चा करत बसणे योग्य नाही. १९९९ मध्ये खासदार नारायण राणे यांनी ही योजना आणली. त्यानंतर मेटेनन्स आपल्याला करायला हवं. अन्य काही गोष्टी करायला हव्या होत्या. त्या मागच्या दहा वर्षामध्ये न झाल्यामुळे आपल्याला हा जो काही वाढीव खर्च आहे, तो आपला या योजनेतून करावा लागत आहे, असेही राणे म्हणाले. शहराच्या घेतलेल्या या आढाव्यानुसार आवश्यक विकासकामे पूर्ण करण्याचा शब्द मी देत आहे, असेही राणे म्हणाले.

शहरात नवीन वीज यंत्रणा निर्माण करणार !

येणाऱ्या काळात या शहरांमध्ये अनेक कामे करण्यासारखी आहेत. मालवण शहरात वादळांमध्ये अनेक दिवस वीजपुरवठा खंडित होण्याची समस्या निर्माण झाली होती. त्यामुळे आता शहरात वीजपुरवठा खंडित होऊ नये, यासाठी ज्या-ज्या शहरांमध्ये जास्त पाऊस पडतो, तेथे उभारण्यात येणारी विजेची यंत्रणा मालवण शहरात उभारण्यासाठी आपला प्रयत्न आहे. ती उभारण्यात येणार आहे. जेणेकरून कोणतेही वादळ आले, तरी शहरातील वीजपुरवठा खंडित होणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे, असेही राणे म्हणाले.

येत्या काळात रॉक गार्डनमध्येही अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. गेल्या काही महिन्यांत मुख्याधिकारी यांचे कार्य जनतेने पाहिलेले आहे. प्रशासनाला भक्कम पाठिंबा दिल्यानंतर काय काम होऊ शकते, हे मुख्याधिकारी यांनी दाखवून दिलेले आहे. त्यामुळे त्यांचे अभिनंदन करतो. आढावा बैठक झाल्यानंतर काही तासांत रंगीत कारंजा सुरू झाला, आमदार झाल्यानंतर बोर्डिंग मैदानावरील हायमास्ट पेटला, नळयोजनेचा शुभारंभ झाला. अशाप्रकारे अनेक कामे शहरात होऊन आता जनतेला बदल झाल्याचे दिसून येईल, असेही राणे म्हणाले. असे अनेक उपक्रम नीलेश राणे पंधरा दिवसात करू शकतो, तर मागच्या दहा वर्षांत का होऊ शकले नाही हा तुमच्यासमोर प्रश्न पडला असेल पण मी तुम्हाला खात्री देतो, शब्द देतो, येणाऱ्या पाच वर्षांमध्ये असं काम करून दाखवेन, की मागची दहा वर्षे आपल्याला ध्यानातही राहणार नाहीत, अशी पुढची पाच वर्षे मी उभी करेन, अशी आपल्याला खात्री देतो, असेही राणे म्हणाले. पत्रकारांना मी मनापासून पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देतो, असेही राणे म्हणाले.

सात हजार नळग्राहक निर्माण होणार !

धामापूर पंपिंग स्टेशन येथे जादा क्षमतेचा पंप, धामापूर पंपिंग स्टेशन येवून कुंभारमाठ जलशुद्धिकरण प्रकल्पापर्यंत पाईपलाईन, तेवून मालवण शहरात पाईपलाईन, शहरात दोन ठिकाणी काही लाख लिटर क्षमतेच्या पाणी साठवणूक टाक्या. कुंमारमाठ येथून अन्य मंजूर गावात पाणी नेण्यासाठी साठवणूक व्यवस्था. अशा नव्या व दर्जेदार कामांचा समावेश असून नागरिकांना नियमितपणे शुद्ध पाणी मिळावे, यासाठी योग्य नियोजन करण्यात आले आहे. नवीन सात हजार नळ ग्राहक असणार आहेत. पावसाळी कालावधी वगळून दोन वर्षांत मे. अभिषेक इन्फ्रा अँड डीडी कॅन्स्ट्रक्शन या मक्तेदार कंपनीला काम पूर्ण करण्याची मुदत आहे. कन्सल्टन्सी फर्म पीसीएसकेके (जेव्ही) मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम होणार आहे. ठेकेदार एजन्सीने हे काम २४ महिन्यांपूर्वी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत. काम दर्जेदार करून संपूर्ण राज्यात आपले नाव व्हावे. त्यामुळे तुमचे अभिनंदनच करू, तुमचं कौतुकच करू, असं काम करा, की पुढची शंभर-दीडशे वर्षे तुमच्या कामाचं कौतुक होईल, असं काम आपल्या हातून घडू दे, अशा शब्दांत आमदार राणे यांनी सांगितले.

rapan bottom