Friday, 30 October 2026
Latest News
सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड
ruchira top

भाजपा सदस्यता महाअभियान मध्ये मालवण तालुका अग्रेसर रहावा : मंत्री नितेश राणे

भाजपा सदस्यता महाअभियान मध्ये मालवण तालुका अग्रेसर रहावा : मंत्री नितेश राणे

मालवणातील सदस्यता महाअभियानचा मालवण भाजपा कार्यालय येथे घेतला आढावा

मालवण | प्रतिनिधी : मालवण तालुका हा राणे साहेबांचा हक्काचा बालेकिल्ला असलेला तालुका आहे. हा तालुका भाजपा सदस्यता महाअभियान मध्ये अग्रेसर राहावा. असे आवाहन राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी मालवण येथे केले.

भारतीय जनता पार्टीच्या सदस्यता महा अभियान २०२५ निमित्ताने राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी मालवण शहर भाजपा कार्यालय येथे रविवारी सायंकाळी भेट देत सदस्यता महाअभियान मोहिमेचा आढावा घेतला. सर्व पदाधिकारी यांनी जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करून पक्ष संघटना अधिक सक्षम करावी, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. यावेळी मंत्री नितेश राणे यांचे मालवण भाजपा कार्यालय येथे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शन

यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, जेष्ठ पदाधिकारी विलास हडकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, शहरअध्यक्ष बाबा मोंडकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, अभियान प्रमुख राजु परुळेकर, माजी सभापती अजिंक्य पाताडे, तालुका सरचिटणीस महेश मांजरेकर, तालुका प्रभारी आप्पा लुडबे, युवामोर्चा शहर अध्यक्ष ललित चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष राकेश सावंत, निषय पालेकर, दाजी सावजी यांसह अन्य पदाधिकारी, महिला पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी धोंडी चिंदरकर, बाबा मोंडकर, महेश मांजरेकर, राजु परुळेकर यांनी मालवण तालुक्यात सुरु असलेल्या सदस्य नोंदणी बाबत माहिती दिली. मोठया संख्येने भाजपा पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

पुढे बोलताना मंत्री नितेश राणे म्हणाले, 12 जानेवारीला भाजपचे राष्ट्रीय अधिवेशन आहे. त्या अधिवेशनात सदस्य नोंदणीचा आढावा राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा घेणार आहेत. मालवण तालुका हा माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे सदस्य नोंदणीत मालवण तालुक्याने आघाडी घेतली पाहिजे. जेवढे जास्त सदस्य नोंदणी होईल तेवढा निधीच्या बाबतीत झुकत माप दिल जाईल. खासदार नारायण राणे साहेब यांनीही व्हिडीओ द्वारे सदस्य नोंदणीचे आवाहन केले आहे. मालवण तालुक्यात भाजपामध्ये मातब्बर नेते आहेत. वेळ पडली तर विरोधकांची 50 माणसं सदस्य म्हणून आणणारी माणसं मालवणात आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त सभासद नोंदणी करा. असे आवाहन मंत्री नितेश राणे यांनी केले.

आमदार निलेश राणे यांच्यावर आमचा जास्त अधिकार

या मतदार संघात महायुतीचे आमचे आमदार निलेश राणे यांच्यावर भाजपाचाही तेवढाच हक्क आहे. आम्ही भाजपामध्ये आहोत त्यामुळे अजून अर्धा टक्का जास्त आपला हक्क त्याच्यावर आहे. असेही मंत्री नितेश राणे म्हणाले.

rapan bottom