Friday, 30 October 2026
Latest News
सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड
ruchira top

आमदार निलेश राणे यांच्या हस्ते उद्या मालवण शहर पाणीपुरवठा योजना वृद्धिंगत योजनेचे भूमिपूजन

आमदार निलेश राणे यांच्या हस्ते उद्या मालवण शहर पाणीपुरवठा योजना वृद्धिंगत योजनेचे भूमिपूजन

मालवण | प्रतिनिधी : महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान राज्यस्तर अभियानातून मालवण शहराची जलवाहिनी अर्थात मालवण शहर पाणीपुरवठा योजना वृद्धिंगत होणार आहे. सुमारे 43 कोटी प्रशासकीय मान्यता रक्कमेतून नळपाणी योजनेचे विस्तारिकरण व नूतनीकरण होणार आहे. आमदार निलेश राणे यांच्या यशस्वी पाठपुराव्याने महायुती शासनाच्या माध्यमातून ही योजना मंजूर झाली आहे. पाणीपुरवठा योजना कामाचा भूमिपूजन शुभारंभ खासदार नारायण राणे, मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत मालवण कुडाळचे आमदार निलेश राणे यांच्या हस्ते सोमवार 6 जानेवारी रोजी मालवण येथे संपन्न होणार आहे.

पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन जल शुद्धीकरण केंद्र कुंभारमाठ येथे होणार आहे. तर भरड मालवण येथील नगरपरिषद वाहनतळ येथे भूमिपूजन कार्यक्रम होणार आहे.

मालवण शहराला पाणीपुरवठा करणारी योजना माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे यांनी 1999 साली साली विशेष बाब म्हणून मंजूर करून आणली. धामपूर तलावातून पाणी उपसा करून मालवण शहरापर्यत आणली गेलेली ही पाणीपुरवठा योजना अतिशय महत्वपूर्ण ठरली. शहरातील अनेक भागात उन्हाळ्यात निर्माण होणारी पाणी टंचाई, किनारपट्टी भागात असलेली क्षारयुक्त पाण्याची समस्या यावर पाणीपुरवठा योजना वरदान ठरली. खासदार नारायण राणे यांचे दूरदृष्टी नेतृत्व व निधी खेचून आणण्याची धमक अतिशय महत्वाची राहिली.

दरम्यानच्या काळात पाणीपुरवठा नळकनेक्शन ग्राहक वाढत गेले. नागरिकांसाठी ही योजना जलवाहिनी बनली. योजनेवर भार वाढत गेले. योजनेवर दुरुस्ती करण्यात आली. कालांतराने आता जीर्ण झालेल्या या योजनेच्या नूतनीकरणसाठी मागील काही काळापासून निलेश राणे हे पाठपुरावा करतं होते. अखेर नवी योजना मंजूर झाली.

धामापूर पंपिंग स्टेशनं येथे जादा क्षमतेचा पंप, धामापूर पंपिंग स्टेशनं येथून कुंभारमाठ जलशुद्धीकरण प्रकल्प पर्यत पाईपलाईन तिथून मालवण शहरात पाईपलाईन, शहरांत दोन ठिकाणी काही लाख लिटर क्षमतेच्या पाणी साठवणूक टाक्या. कुंभारमाठ येथून अन्य मंजूर गावात पाणी नेण्यासाठी साठवणूक व्यवस्था. अश्या नव्या व दर्जेदार कामांचा समावेश असून नागरिकांनी नियमितपणे शुद्ध पाणी मिळावे यासाठी योग्य नियोजन करण्यात आले आहे. पावसाळी कालावधी वगळून दोन वर्षात मे. अभिषेक इन्फ्रा अँड डी. डी. कन्स्ट्रक्शन यां मक्तेदार कंपनीला काम पुर्ण करण्याची मुदत आहे.
कॅन्सल्टन्सी फर्म पीसीएसकेके (जेव्ही) मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम होणार आहे.

एकूणच मालवणसाठी अत्यंत महत्वाची असलेली ही पाणीपुरवठा योजना नूतनीकरण व विस्तारित होत असल्याचा लाभ नागरिकांना होणार आहे.

rapan bottom