मालवण : खेळामुळे मनुष्याच्या अंगी विविध कौशल्य निर्माण होतात.त्यामध्ये कबड्डी, खो-खो, रीले यासारख्या विविध खेळातून सांघिक भावना निर्माण होते आणि अशाच प्रकारची खेळाची परंपरा ज्ञानदीप विद्यालय हिवाळे हायस्कूल जोपासत आहे याबद्दल बाबा परब यांनी कौतुक उद्गार काढले.बक्षीस वितरण आणि गुणगौरव सोहळ्यामध्ये ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. याप्रसंगी याप्रसंगी प्रमुख मान्यवरांमध्ये महेंद्र चव्हाण-माजी वित्त व बांधकाम सभापती, श्री महेश गावडे -ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संघाचे अध्यक्ष, कार्यवाह श्री चंद्रकांत चव्हाण,हिवाळे गावचे सरपंच श्री रघुनाथ धुरी,ओवळिये गावचे उपसरपंच श्री चंद्रकांत पडवळ संस्था पदाधिकाऱ्यांमधून श्री संदीप सावंत, नवीन हिर्लेकर श्री प्रदीप सावंत-जिल्हा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे कार्यवाह श्री. कैलास घाडीगावकर- शिक्षकेतर कर्मचारी संघटना मालवण तालुका अध्यक्ष काशिनाथ हिवाळेकर माजी उपसरपंच संजय गावडे, प्रदीप मेस्त्री-माजी उपसरपंच,महेंद पालव-उद्योजक विक्रांत नाईक उद्योजक हिवाळे ओवळीये गावचे आजी-माजी विद्यार्थी पालक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या प्रसंगी बोलताना श्री बाबा परब यांनी हिवाळे हायस्कूल मधील विविध उपक्रमांबद्दल कौतुक उद्गार काढले प्रमुख उपस्थितामधून मनोगत व्यक्त करताना मा. श्री महेंद्र चव्हाण यांनी नवीन कार्यकारणीचे अभिनंदन करत जुन्या कार्यकारिणीचा आदर्श घेऊन यशस्वी वाटचाल करत असल्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यवाह चंद्रकांत चव्हाण यांनी प्रशालेमध्ये सुरू असणाऱ्या विविध उपक्रमाबाबत मिळत असणाऱ्या माजी विद्यार्थ्यांच्या सर्वतोपरी सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले आणि असेच प्रेम सहकार्य भविष्यातही मिळावं अशी अपेक्षा व्यक्त केली.

कैलास घाडीगावकर- शिक्षकेतर कर्मचारी संघटना मालवण तालुका अध्यक्ष यांचा शाल श्रीफळ देऊन याप्रसंगी यथोचित सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे प्रदीप सावंत शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे जिल्हा कार्यवाह यांनाही शाल श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाच्या प्रसंगी विद्यार्थ्यांच्या विविध कला गुणदर्शन कार्यक्रमाने श्रोत्यांची वाहवा मिळवली. गणित चुकलं या मालवणी नाटीकेने सर्व प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. विविध कार्यक्रमांच्या नावीन्यपूर्ण सादरीकरणासाठी विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल संस्था अध्यक्ष श्री.महेश गावडे यांनी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री एन.डी.पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन आणि सूत्रसंचालनाची धुरा प्रशाळेचे शिक्षक महेंद्र नाईक यांनी बजावली. तर विविध गुणदर्शन सोहळ्याचे सूत्रसंचालन कुमारी चरित्रा गावकर आणि सौ. पूर्वा आंगणे यांनी पार पाडली.

