आदित्य बटावले | सावंतवाडी : फणसवडे ग्रामदैवत श्री देव मल्लनाथ देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव सोमवार ६ जानेवारी रोजी होणार आहे. हे अति दुर्गमस्थान असूनही हजारो भाविक या दिवशी मल्लनाथ चरणी मस्तक होतात. यानिमित्त मंदिरात सकाळी धार्मिक कार्यक्रम आटोपल्यानंतर नवस बोलणे फेडणे, माया देवीची ओटी भरणे, नारळ ठेवणे आदी कार्यक्रम होणार आहेत. रात्री सवाद्य पालखी सोहळ्यानंतर जय हनुमान दशावतार नाट्य मंडळाचे (आरोस-दांडेली) नाटक होणार आहे. भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थानचे मानकरी आणि फणसवडे ग्रामस्थांनी केले आहे.

