आदित्य बटावले | कणकवली : कणकवली-कलमठमार्गे बिडवाडी-निरोम या मार्गावर कलमठ ते वरवडेदरम्यान मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. पावसाळ्यापासून हे खड्डे बुजविण्याबाबत पावले न उचलल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते. त्यातच अनेकदा एका बाजूचे खड्डे चुकविण्यासाठी वाहनचालक विरुद्ध दिशेने वाहने चालवित येत असल्याने अपघाताचीही शक्यता आहे. त्यामुळे या मार्गावरील खड्डे तातडीने सार्वजनिक बांधकाम विभागाने बुजवावेत, अशी मागणी होत आहे.

कलमठ-वरवडे मार्गावरील खड्डे बुजविण्याची ग्रामस्थांची मागणी
