७ जानेवारी रोजी घुमडाई मंदिर, घुमडे येथे आयोजन
मालवण : शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त दत्ता सामंत मित्रमंडळ आणि शिवसेना मालवण तालुका यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
मंगळवार ७ जानेवारी रोजी सकाळी ९ ते २ या वेळेत घुमडाई मंदिर, घुमडे या ठिकाणी रक्तदान शिबिर संपन्न होणार आहे. तरी रक्तदात्यानी रक्तदान शिबिरास उपस्थित राहावे. असे आवाहन दत्ता सामंत मित्रमंडळ आणि शिवसेना मालवण तालुका यांच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी राजू बिडये : ८४५९३८०८२४, उन्मेश बिरमोळे : ९४२३२१५६५६, मंदार लूडबे : ९५९५००९११०, बाळा माने : ७५०७५२०१०० यांच्याशी संपर्क साधावा

