आदित्य बटावले | सावंतवाडी : सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील डायलिसिस मशीन गेल्या आठ दिवसांपासून नादुरुस्त आहे. ही मशिनरी दहा वर्षेहून अधिक वर्षे रुग्णांना सेवा देत असून या मशिनरीचा गॅरंटी पिरेड संपलेला आहे. डायलिसिस विभागाचे टेक्निशियन यांनी रिपोर्ट देऊन नवीन मशीनरी मिळण्यासाठी डायलिसिस विभागाच्या अधिकाऱ्यांना तसे कळविले आहे.
जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांना रुग्णांच्या नातेवाईकांनी माहिती दिल्यानंतर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.गिरीश चौगुले यांना सविस्तर माहिती दिल्यानंतर व तशा प्रकारचे रुग्णालयाचे डायलिसिस विभागाचे टेक्निशन यांनी रीतसर सावंतवाडी कार्यालयामध्ये लेखी लेखी दिल्यानंतर सावंतवाडीचे अधीक्षक डॉ.गिरीश चौगुले यांनी जिल्हा रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन यांना रीतसर नवीन डायलिसिस मशीनरी खरेदी करण्यासाठी मसुरकर यांनी सांगितले. त्यानंतर जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी जिल्हा रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन डॉ.श्रीपाद पाटील यांना मोबाईल वरती सविस्तर माहिती दिली.
जिल्हा नियोजन मार्फत किंवा सी एस आर फंड तसेच शासनामार्फत १५ लाख रुपयांची नवीन मशीनरी खरेदी करण्याची मागणी करण्याचे सांगण्यात आले. जिल्हा नियोजनची सभा मार्च २०२५ मध्ये होणार आहे. त्याआधी डायलिसिसची मशीन मिळण्यासाठी शासनामार्फत किंवा सीएसआर फंड मधून लवकरात लवकर खरेदी करण्यासाठी जिल्हा रुग्णालयाचे सिविल सर्जन डॉ.श्रीपाद पाटील यांनी जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांना आश्वासन दिले.
यामुळे लवकर डायलिसिस विभागाची एक मशीन लवकरात लवकर चालू व्हावी यासाठी कसोशीने प्रयत्न मसुरकर हे करणार आहेत.
जेणेकरून डायलिसिस विभागाचे रुग्ण यांना खाजगीरित्या आठवड्यातून दोन वेळा डायलिसिस करणे आर्थिक दृष्ट्या न परवडणारे आहेत.
जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी नवीन डायलीसीस मशीनरी मिळण्यासाठी प्रयत्न चालू केले आहेत.

