मालवण : भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा मालवण अंतर्गत गाव शाखा राठीवडे यांच्यावतीने शौर्य दिनाच्या निमित्ताने अभिवादन करण्यासाठी भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाची प्रतिकृती तयार केली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी जिल्हा सरचिटणीस संजय पेंडूरकर, जिल्हा कोषाध्यक्ष शिवप्रसाद चौकेकर, तालुकाध्यक्ष रविकांत कदम, तालुका सरचिटणीस प्रकाश पवार, जिल्हा महिला संस्कार उपाध्यक्ष स्नेहा पेंडूरकर, जिल्हा महिला संरक्षण उपाध्यक्ष प्रीतम जाधव, तालुका संस्कार उपाध्यक्ष नचिकेत पवार, संस्कार सचिव योगेश वराडकर, संरक्षण उपाध्यक्ष भगवान जाधव, सचिव रमेश कदम, प्रचार व पर्यटन सचिव सचिन कासले, संग्राम कासले, तालुका संघटक अशोक पवार, गाव शाखा राठीवडे अध्यक्ष राजेंद्र जाधव, सचिव हेमंत जाधव, रामचंद्र कदम, गणेश कासले, पुरुषोत्तम कासले, सिद्धार्थ कदम, दिनेश कदम हिवाळे, रोहन चौकेकर, नारायण जाधव, किशोर जाधव, दीपक जाधव, निखिल जाधव तसेच मोठ्या प्रमाणावर उपासक उपासिका व बाल बालिका उपस्थित होत्या. यावेळी संजय पेंडूरकर, शिवप्रसाद चौकेकर, रविकांत कदम, प्रकाश पवार, नचिकेत पवार, योगेश वराडकर, संग्राम कासले यांनी आपल्या मनोगतातून उपस्थित त्यांना मार्गदर्शन केले व आजच्या परिस्थितीनुरूप आपण कशाप्रकारे वागावे तसेच लगेचच कोणत्याही घटनेबद्दल किंवा प्रसंगाबद्दल आपले मत व्यक्त न करता किंवा प्रतिक्रिया न देता विचारपूर्वक वर्तन करावे याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले तसेच भीमा कोरेगावच्या युद्धाच्या प्रसंगाला मनोगतातून व्यक्त करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन भगवान जाधव यांनी केले.

