मालवण : रोटरी क्लब मालवण आयोजित व रो. अपूर्व फर्नांडिस पुरस्कृत शालेय विद्यार्थ्यांसाठी तालुकास्तरीय पाढे पाठांतर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.13 जानेवारी रोजी दुपारी 2 ते 5 यावेळेत जय गणेश स्कूलमध्ये ही स्पर्धा संपन्न होणार आहे.
ही स्पर्धा 5 वी ते 7 वी व 8 वी ते 10 वी अशा दोन गटात घेण्यात येणार आहे. 5 वी - 7 वी गटातील विजेत्यांना प्रथम क्रमांक 1000 व चषक, द्वितीय क्रमांक 700 रुपये, तृतीय क्रमांक 500 रुपये व 8 वी ते 10 वी गटातील विजेत्यांना प्रथम क्रमांक 1200 व चषक , द्वितीय क्रमांक 1000 रुपये व तृतीय क्रमांक 700 रुपये अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत.

या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना नावनोंदणी लिमये हॉस्पिटल ( 9422076805 / 02365 252266 ) येथे 10 जानेवारी पर्यंत करता येणार आहे. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन रोटरी क्लब मालवण यांच्या वतीने करण्यात आले आहे

