Friday, 30 October 2026
Latest News
सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड
ruchira top

Malvan : सिंधुदुर्ग मत्स्य विभागाची परराज्यातील हायस्पीड बोटींवर धडक कारवाई सुरूच

Malvan : सिंधुदुर्ग मत्स्य विभागाची परराज्यातील हायस्पीड बोटींवर धडक कारवाई सुरूच

कर्नाटक मलपी येथील नौका पकडली : महिन्याभरात परराज्यातील नौकांवरील चौथी कारवाई

सिंधुदुर्ग, महाराष्ट्र सागरी जलधीक्षेत्रात घुसखोरी करून हायस्पीड बोटी करतात अवैध मासेमारी

मालवण | प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्याच्या जलधी क्षेत्रात घुसखोरी करून अवैध मासेमारी करणारी कर्नाटक मलपी येथील हायस्पीड नौका 'संनिधी 1' ही सिंधुदुर्ग मत्स्य विभागाने पकडली. सिंधुदुर्ग किनारपट्टीवरील निवती समोरील समुद्रात ही कारवाई करण्यात आली असून पुढील कार्यवाहीसाठी नौका मालवण सर्जेकोट बंदरात आणण्यात आली आहे.

सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय सिंधुदुर्ग सागर कुवेसकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिन्याभरत परराज्यातील नौकांवर करण्यात आलेली ही चौथी कारवाई ठरली आहे. परराज्यातील नौकांची महाराष्ट्र सागरी जलधी क्षेत्रात होणारी घुसखोरी, मासळीची होणारी लूट, स्थानिक मच्छिमारांचे होणारे नुकसान थांबले पाहिजे. याबाबत सातत्याने आवाज उठवून आक्रमक भुमिका मांडणारे आमदार निलेश राणे, मत्स्यविकास मंत्री नितेश राणे यांची सातत्यापूर्ण भूमिकाही यां सर्व कारवाईत महत्वपूर्ण ठरली आहे.

मत्स्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार 31 डिसेंबर रोजी रोजी सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय सिंधुदुर्ग सागर कुवेसकर यांच्या मार्गदर्शनाखाली मत्स्य विभागाच्या शितल नौकेतून सागरी गस्ती सुरु होती. यां दरम्यान परवाना अधिकारी मालवण मुरारी भालेकर, सहकारी सागरी सुरक्षा पर्यवेक्षक,रक्षक दिपेश मायबा, मिमोह जाधव, स्वप्निल सावजी, चंद्रकांत उर्फ भाऊ कुबल, दिवाकर जुवाटकर, शुभम राऊळ पोलीस कॉन्स्टेबल गुरुनाथ परब यांनी कर्नाटक मलपे येथील नौका श्री संनिधी 1 क्रमांक IND-KA-02-MM-4594 महाराष्ट्र राज्याच्या जलाधी क्षेत्रात सिंधुदुर्ग निवती समोर 10 सागरी नॉटीकल मैल क्षेत्रात अवैध्य मासेमारी करताना पकडली. पुढील कार्यवाहीसाठी नौका मालवण सर्जेकोट बंदरजेटी येथे आणण्यात आली आहे. नौकेची तपासणी, मासळीचे लिलाव व अन्य कार्यवाही सुरु होती. सदर नौका मालकाविरुद्ध महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियमन १९८१ अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. अशी माहिती देण्यात आली.

मत्स्य विभागाकडून सातत्याने अवैध हायस्पीड नौकावर सुरु असलेल्या कारवाई बाबत मच्छिमार वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. तसेच अशीच कारवाई सुरु राहावी अशीही अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

आमदार निलेश राणे यांची भुमिका ठरली महत्वपूर्ण

महाराष्ट्राच्या सागरी किनारपट्टीवर घुसखोरी करणाऱ्या मलपी बोटींच्या विरोधात आमदार निलेश राणे यांनी घेतलेल्या आक्रमक पावित्र्यानंतर महाराष्ट्र सागरी जलधीक्षेत्रात घुसखोरी करून अवैध मासेमारी करणाऱ्या कर्नाटक मलपी बोटीवर कारवाई झाली आहे. महिनाभरात झालेली ही चौथी कारवाई आहे. मालवणसह लगतच्या किनारपट्टीवर सातत्याने यां नौका घुसखोरी करतं असताना गेल्या दहा वर्षात जे झालं नाही ते महिन्याभरात झाले. सलग चार घुसखोर बोटींवर कारवाई झाली. लोकप्रतिनिधी कसा असायला हवा याच उदाहरण आमदार निलेश राणे यांच्या रूपातून दिसते आहे. त्यासोबत यां खात्याचे नवनियुक्त मंत्री नितेश राणे यांचीही भुमिका कारवाईत महत्वाची ठरली.

rapan bottom