Friday, 30 October 2026
Latest News
सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड
ruchira top

सेवानिवृत्त शिक्षकांसाठी ३ रोजी ओरोसला मार्गदर्शन

सेवानिवृत्त शिक्षकांसाठी ३ रोजी ओरोसला मार्गदर्शन

मिली मिश्रा | सावंतवाडी : जिल्हा परिषदेकडून सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांना शासन व प्रशासनाकडून देय असणाऱ्या लाभाच्या रकमा निवृत्तीनंतर दीर्घकाळ उलटला, तरी त्या वेळीच मिळत नाहीत. त्यामुळे सेवानिवृत्त कर्मचारी शासकीय लाभापासून वंचित राहतात, जि. प.कडून सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांच्या उपदान, अंशराशीकरण, भविष्य निर्वाह निधी, गटविमा, सातव्या वेतन आयोगाच्या फरकाचे हप्ते व अन्य कार्यरत कालावधीतील अनेक प्रकारच्या रकमा अद्यापही मिळालेल्या नाहीत. अशा सेवानिवृत्त शिक्षकांसाठी ३ जानेवारी रोजी सकाळी १० वा. जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढी, सिंधुदुर्गनगरी येथे मार्गदर्शन आयोजित केले आहे.
सभेसाठी येताना प्रत्येकाने आपल्या सेवानिवृत्तीच्या चार पानी आदेशाची सुस्पष्ट छायांकित प्रत, निवृत्ती वेतन जुने व नवे पासबूक तसेच आपल्या सेवानिवृत्ती व प्रलंबित आर्थिक लाभासंदर्भात जे-जे कागदपत्रं उपलब्ध असतील, ते घेऊन उपस्थित राहायचे आहे. आपल्या कागदपत्रांची आपण योग्य काळजी घ्यायची आहे. जिल्हा शिक्षक प्रतिनिधी सुरेश पेडणेकर, चंद्रकांत अणावकर, सुधाकर देवस्थळी, विजय मयेकर व अन्य शिक्षक प्रतिनिधी मार्गदर्शन करणार आहेत. लाभ घ्यावा, असे आवाहन रमेश आर्डेकर, बाबू परब, सोनू नाईक यांनी केले आहे.

rapan bottom