Friday, 30 October 2026
Latest News
सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड
ruchira top

बाबा वर्दम स्मृती नाट्य महोत्सवाचा कार्यक्रम जाहीर

बाबा वर्दम स्मृती नाट्य महोत्सवाचा कार्यक्रम जाहीर

७ ते १३ जानेवारीला कुडाळमध्ये होणार नाट्यमहोत्सव

महोत्सवात महाराष्ट्रसह गोवा आणि मध्यप्रदेश मधून देखील दर्जेदार नाटके

निलेश जोशी | कुडाळ : बाबा वर्दम थिएटर्स कुडाळ आयोजित कै बाबा वर्दम नाट्यमहोत्सव २०२५ ची घोषणा करण्यात आली आहे. कुडाळच्या बाबा वर्दम स्मृती रंगमंचावर येत्या ७ ते १३ जानेवारीला हा महोत्सव होत आहे. यामध्ये महाराष्ट्रासह गोवा आणि मध्य प्रदेश मधील दर्जेदार नाटकं रसिकांना पाहायला मिळणार आहेत. महोत्सवाचे यंदाचे २७ वे वर्ष आहे. बाबा वर्दम थिएटर्सचे कार्यवाह केदार सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत हि माहिती दिली. यावेळी ज्येष्ठ दिग्दर्शक चंदू शिरसाट उपस्थित होते.
केदार सामंत म्हणाले, बाबा वर्दम थिएटर्स, ही कुडाळ (जि. सिंधुदुर्ग) येथील हौशी कलाकारांची नाट्यसंस्था, कुडाळ येथील कै. बाबा वर्दम, कै. वामनराव पाटणकर, कै. शंकरभाई वर्दम, कै. एकनाथजी ठाकूर, कै. प्रकाश पाटणकर यांच्या प्रेरणेने व प्रतिभावंत दिग्दर्शक चंदू शिरसाट व विद्यमान अध्यक्षा सौ. वर्षा वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली गेली ५३ वर्ष महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात अग्रस्थानी आहे. रंगभूषामहर्षी कै. बाबा वर्दम यांच्या प्रेरणेने ही नाट्यसंस्था सुरू झाली. कै. बाबा उर्फ सखाराम गमशेट वर्दम यांचा जन्म कुडाळ येथे दिनांक ७ जानेवारी १९०९ रोजी झाला. कै. बाबा हे, हिन्दी-मराठी नाट्य-चित्रपट क्षेत्रातील प्रतिभाशाली रंगभूषाकार म्हणून ओळखले जातात. प्रसिध्द दिग्दर्शक कै. व्ही. शांताराम यांच्या राजकमल कलामंदिचे ते रंगभूषाकार. त्यांनीच 'झनक झनक पायल बाजे' या अजरामर चित्रपटातील कलाकारांची रंगभूषा केली होती. आजही त्यांचे नाव मराठी नाटय-चित्र क्षेत्रात 'रंगभूषामहर्षी' म्हणून आदराने घेतले जाते. त्यांच्या सन्मानार्थ अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेतर्फे दरवर्षी 'उत्कृष्ट रंगभूषाकार' हा पुरस्कार देण्यात येतो. बाबा वर्दम यांच्या मृत्यूनंतर या नाट्यसंस्थेचे नामकरण 'बाबा वर्दम थिएटर्स' असे करण्यात आले.
सन १९९९ पासून बाबा वर्दम थिएटर्स, कै. बाबा वर्दम यांचे नांवे 'कै. बाबा वर्दम स्मृती आंतरराज्य नाट्यस्पर्धा' आयोजित करण्यात येत होती. सन २०१५ पासून संस्थेने स्पर्धेचे स्वरुप बदलून नाट्यमहोत्सव सुरु करण्यात आला. या उपक्रमाचे हे २७ वे वर्ष असून यावर्षी राज्यभरातील नामवंत संघांची ७ उत्तम नाटके या नाट्यमहोत्सवात सादर होणार आहेत. यावर्षी हा नाट्यमहोत्सव दि. ७ जानेवारी ते १३ जानेवारी २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन मंगळवार दिनांक ०७ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ७.०० वा. बाबा वर्दम थिएटर्स, कुडाळ च्या अध्यक्षा सौ. वर्षा वैद्य यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत होईल. महोत्सवाचे हे २७वे वर्ष असून या महोत्सवाने महाराष्ट्रभर स्वतःचे असे विशेष स्थान निर्माण केले आहे. कुडाळचे सांस्कृतिक वैभव ठरलेल्या या महोत्सवाचे उत्तम व्यवस्थापन हे खास वैशिष्ट्य आहे. संपूर्ण महाराष्ट्रात ख्याती झाली असून, प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद ही या महोत्सवाची आणखी एक जमेची बाजू आहे. गेल्या २७ वर्षात महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक, मध्यप्रदेश, गोवा येथील नामवंत नाट्यसंघांनी या स्पर्धेत आपली नाटके सादर केली आहेत.
यावर्षी एकूण ४२ नाट्यसंघानी प्रवेशिका पाठविल्या होत्या. त्यातील २० प्रवेशिकांची निवड करण्यात आली. त्या निवडलेल्या प्रवेशिकांच्या तालमी बाबा वर्दम थियेटर्सच्या निवड समितीने त्या त्या ठिकाणी जाऊन पहिल्या आणि त्यातूननिवड झालेली नाटके या महोत्सवात सादर होणार आहेत. यंदा पुणे, मुंबई, कल्याण, सांगली, इंदोर (मध्यप्रदेश), गोवा येथील नामवंत संघांची नाटके पहाण्याची सुवर्णसंधी कुडाळच्या रसिकांना प्राप्त झाली आहे. सर्व नाट्यरसिकांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन बाबा वर्दम थिएटर्स तर्फे करण्यात आले आहे.

नाट्यमहोत्सवाचा कार्यक्रम

 या नाट्यमहोत्सवामध्ये ७ जानेवारी रोजी अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समिती सांगली यांचे 'देहभान', ८ जानेवारी रोजी श्री नागेश महालक्ष्मी प्रासादिक नाट्य समाज बांदिवडे-गोवा यांचे 'नमन नटवरा', ९ जानेवारी रोजी आमचे आम्ही पुणे निर्मित 'नास्ति तृष्णा समो व्याधी:', १० जानेवारी रोजी  अभिनय, कल्याण निर्मित 'मन', ११ जानेवारी रोजी पार्थ थिएटर्स, मुंबई निर्मित 'मॅड सखाराम' आणि बाबा वर्दम थिएटर्स निर्मित एकांकिका 'ऑफलाईन', १२ जानेवारी रोजी नाट्यभरती, इंदोर-मध्यप्रदेश यांचे  'रा+धा=', आणि १३ जानेवारी रोजी भरत नाट्य संशोधन मंदिर, पुणे निर्मित 'दुरितांचे तिमिर जावो' हि नाटके सादर होणार आहेत.  हि सर्व नाटके बाबा वर्दम रंगमंच सांस्कृतिक भवन, कुडाळ हायस्कुल कुडाळ येथे रोज सायंकाळी ७.३० वाजता सुरु होतील.

rapan bottom