आदित्य बटावले | कुडाळ : लायन्स क्लब ऑफ कुडाळ-सिंधुदुर्गतर्फे आयोजित ऑटो एक्स्पो इंडस्ट्रियल कम फूड फेस्टिव्हलचे उद्घाटन २८ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता येथील कुडाळ हायस्कूलच्या मैदानावर होणार आहे. कुडाळ-मालवण मतदारसंघाचे आमदार नीलेश राणे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. जिल्हाधिकारी अनिल पाटील, पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, लायन्स डिस्ट्रिक्ट प्रथम उपप्रांतपाल वीरेंद्र चिखले, नगराध्यक्षा अक्षता खटावकर, सारस्वत को-ऑप. बँक संचालक तथा सीए सुनील सौदागर, कोकण रिजन महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्टी अॅण्ड अॅग्रिकल्चरचे उपाध्यक्ष श्रीकृष्ण परब, वेस्टर्न रिजन महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉ मर्सचे उपाध्यक्ष रमाकांत मालू, सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांची प्रमुख उपस्थिती आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन लायन्स सेवा संकुलचे अध्यक्ष अॅड. अमोल सामंत यांनी केले आहे.

लायन्सच्या फूड फेस्टिव्हलचे आज कुडाळला उद्घाटन
